शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेल रेल्वे स्थानकावर गुरुवारपासून नव्या तिकीट बुकिंग केंद्राला प्रारंभ

By admin | Updated: May 9, 2016 00:05 IST

येथील मॉडेल रेल्वे स्थानकावर गुरुवारी १२ मेपासून नवीन तिकिट बुकिंग केंद्राला प्रारंभ केला जात आहे.

जयस्तंभकडून येणाऱ्यांना सुविधा : आरक्षण तिकीट मिळणारअमरावती : येथील मॉडेल रेल्वे स्थानकावर गुरुवारी १२ मेपासून नवीन तिकिट बुकिंग केंद्राला प्रारंभ केला जात आहे. या केंद्रातून रेल्वे गाड्यांचे आरक्षण व सामान्य तिकीट मिळणार आहे. जयस्तंभ चौकाकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी ते सोयीचे ठरणारे आहे.मॉडेल रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक रेल्वे आरक्षण केंद्र साकारण्यात आले. मात्र जयस्तंभ चौक, जवाहरगेट, शाम चौक, जुने कॉटन मार्केट, चित्रा चौक, इतवारा बाजार आदी भागातून ये-जा करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना वेढा मारून मॉडेल रेल्वे स्थानक गाठावे लागत होते. परिणामी जयस्तंभ ते रेल्वेस्थानक मार्गावर रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त तिकीट बुकिंग केंद्र साकारले आहे. भवदिव्य असे हे तिकीट आरक्षण केंद्र निर्माण केले. मात्र मनुष्यबळाअभावी धूळखात पडले होेते. मात्र रेल्वे प्रशासनाने अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावर वाढती प्रवासीे संख्या बघता जयस्तंभ मार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे तिकीट बुकिंग केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षण तिकिटाचे केंद्र दोन पाळीत सुरू राहणार आहे. तसेच तीन पाळीत विना आरक्षण तिकिट केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन तिकीट आरक्षण बुकिंग केंद्रात शिल्लक असलेली तांत्रिक कामे पूर्ण करण्याठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वरिष्ठांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. नवीन तिकीट बुकिंग केंद्रात लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी वरिष्ठांनी होकार दिला आहे. या नवीन तिकीट बुकिंग केंद्रामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.आरक्षण तिकिटाची रांग होईल आता कमी मॉडेल रेल्वे स्थानकावर गाड्यांचे आरक्षण मिळविण्यासाठी रात्रीपासून दलाल अथवा प्रवाशांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे. परंतु जयस्तंभ चौकाकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन तिकीट बुकिंग केंद्र सुरू होत असल्याने मॉडेल रेल्वे स्थानकावरील बुकिंग केंद्रावर नक्कीच रेल्वे तिकिट आरक्षणाची रांग कमी होईल.रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र गुरुवारपासून सुरू केले जाणार आहे. याच केंद्रात तांत्रिकदृष्ट्या असलेली कामे पूर्णत्वास आणली जाईल. वरिष्ठांच्या आदेशानुसार हे केंद्र सुरू करण्यात येत आहे.- व्ही. डी. कुंभारे,वाणिज्य निरीक्षक, रेल्वे स्थानक अमरावती