शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वाचनालयामुळे तरुणांकरिता नव्या संधी

By admin | Updated: January 5, 2016 00:07 IST

भिवापूर येथील नवीन वाचनालयामुळे गावातील तरुणांना ज्ञानार्जनात भर पडण्यास तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामपातळीवर पोहोचण्यास या माध्यमातून मदत होतील,...

किरण गित्ते : भिवापूर येथे ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पणअमरावती : भिवापूर येथील नवीन वाचनालयामुळे गावातील तरुणांना ज्ञानार्जनात भर पडण्यास तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामपातळीवर पोहोचण्यास या माध्यमातून मदत होतील, असे मत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी रविवारी येथे व्यक्त केले. भिवापूर गावात ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, सरपंच शालू राठोड, उपसरपंच हृषीकेश आंबेकर, एक्सलन्स ग्रुप पुणेचे अध्यक्ष अरविंद भरडे आणि उपाध्यक्ष कुंजीलाल राठोड आदी उपस्थित होते. येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेत शिक्षण घेतलेले व सध्या पुण्यात प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायी आणि आयटी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या नरेश भरडे यांची संकल्पना आहे. याप्रसगी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या २० गावकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. किरण गित्ते पुढे म्हणाले की, नवीन संधी शोधण्यासाठी गावातील तरुण शहरात स्थलांतर करतात. त्यानंतर ते तेथेच स्थायिक होतात व गावाचा कुठेतरी संपर्क तुटतो. मात्र हे वाचनालय सुरू केल्यामुळे गाव आणि शहरातील अंतर दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. स्वत:च्या घरातील पहिल्या माळ्यावर सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण करणे ही प्रशंसनीय बाब आहे. या माध्यमातून भिरडे यांनी तरुणांकरिता नव्या संधी निर्माण केली आहे. उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी जगताप म्हणाले, पुस्तके मिळविण्याकरिता गावातील तरुणांना खूप श्रम घ्यावे लागतात. मात्र, या वाचनालयामुळे एमपीएससी व इतर कोर्सेसची तयारी करणाऱ्या मुलांकरिता चांगली संधी उपलब्ध झाली आहे. (प्रतिनिधी)