शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

भक्ती, संस्कारांच्या बळावर घडेल नवी पिढी

By admin | Updated: October 31, 2015 01:08 IST

भावी पिढी संस्कारक्षम घडवायची असेल तर महिलांनी आपल्या अपत्यावर भक्ती व प्रार्थनेचा संस्कार करावा तरच सक्षम पिढी तयार होईल,

पुष्पा बोंडे : गुरूकुंजात महिला संमेलनाचे उद्घाटनगुरुकुंज मोझरी : भावी पिढी संस्कारक्षम घडवायची असेल तर महिलांनी आपल्या अपत्यावर भक्ती व प्रार्थनेचा संस्कार करावा तरच सक्षम पिढी तयार होईल, असे प्रतिपादन पुष्पा बोंडे यांनी ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवातील महिला संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून केले. यावेळी ‘मी मंजुळा बोलतेय’ हा लक्षवेधी कार्यक्रम महिला संमेलनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. याप्रसंगी मंचावर हर्षलकुमार चिपळूनकर, श्रीमती उषाताई हजारे, सरपंच विद्या बोडखे, अनुराधा प्रवीण पोटे, वसुंधरा अनिल बोंडे, पद्मा दिलीप निंबोरकर, शैलजा गावंडे, भारती पाचघरे, शशीकला नागमोते, आशा बोरडकर, श्रीमती द्वारकाबाई गोहत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. बोंडे पुढे म्हणाल्या की, युवापिढीवर भक्ती व प्रार्थनेचा संस्कार नसल्यामुळे त्यांच्यातील वासना वारंवार जागृत होऊन त्यांच्यात विकृती निर्माण झालेली आहे. म्हणून महिलांनी स्वत:च्या सक्षमीकरणाबरोबर आपल्या पाल्यावर संस्कार करावे. शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी असे तुकाराम महाराज म्हणतात. त्यामुळे महिलांनी गर्भावस्थेतच स्वत:वर चांगले संस्कार करून घेणे महत्त्वाचे आहे. माणूस वयाने किती मोठा झाला याला महत्त्व नसून त्यांच्यात सद्गुण किती आहे हे महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जण समजून घेत होता. परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती वाढल्यामुळे कुटुंबातील आपुलकीची भावना कमी झाली असून नैराश्य वाढले आहे. आजची युवापिढी विज्ञानाने घेतलेल्या झेपमुळे सतत मोबाईलवर असतात. परंतु हे वलय भौतिक सुखाचे असून अंतरंगात ध्यान व चिंतनाचे संस्कार होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने माणूस निर्माण होणार नाही. माणूस निर्माण होण्यासाठी डोळसबुद्धीने ग्रामगीतेचे संस्कार आचरणात आणावे लागेल. या मेळाव्याला वसुधा बोंडे, शैलजा गावंडे, भारती पाचघरे, उषाताई हजारे यांनीही मार्गदर्शन केले. या मेळाव्यात उदारामजी शेलोटकर व सहपत्नीक ऋतुजा ठाकरे, श्याम देऊळकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ऋतुजा भोयर हिने ‘मी मंजुळा बोलतेय’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मेळाव्याचे प्रास्ताविक विभा वाडेकर यांनी केले. संचालन सविता तायडे व आभार राधिका चौधरी यांनी केले.