शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ता वाढीसाठी नवा प्रयोग

By admin | Updated: September 2, 2014 23:25 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांची ढासळत चाललेली गुणवत्ता वाढविण्यासाठी ई-लर्निंग कृतीयुक्त अध्ययन, मोफत गणवेश, दप्तरे यासारख्या योजना निष्प्रभ ठरत असताना योजनांच्या यादीत आता गुणवत्ता कलाची

अमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांची ढासळत चाललेली गुणवत्ता वाढविण्यासाठी ई-लर्निंग कृतीयुक्त अध्ययन, मोफत गणवेश, दप्तरे यासारख्या योजना निष्प्रभ ठरत असताना योजनांच्या यादीत आता गुणवत्ता कलाची नव्याने भर पडली आहे. मुलांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम यांची माहिती संकलीत करून प्रत्येक योजनेची सद्यस्थिती एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही नवी योजना जिल्हा परिषदेत आकार घेत आहे. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी आदेश दिल्याप्रमाणे कक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून येत्या दोन महिन्यात जिल्हा परिषदेत कक्ष स्थापन केला जाणार आहे. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती दयनीय झाली आहे. शाळांची गुणवत्ता सातत्याने ढासळत चालली आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व मुलांना गुणवत्तेत वाढ करण्यासाठी जि. प. स्तरावर गुणवत्ता कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुणवत्तेत वाढ करण्याच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम शासनाचे आदेश यांची माहिती येथे गोळा केली जाणार असून तत्काळ उपलब्ध केली जाणार आहे. कोणत्या योजनेची काय स्थिती आहे, काय अडचणी येत आहेत, त्यामध्ये काय सुधारणा करणे आवश्यक आहे, याची माहीती वरिष्ठांनाही दिसणार आहे. याबाबत विभागीय आयुक्त स्तरावरूनही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वेगाने काम करण्यात येऊन कक्ष स्थापण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी)