शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

नवा निर्णय अधिक्रमित, जुन्याच निकषाने कपाशीला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:38 IST

गुलाबी बोंडअळीच्या नुकसानासाठी शासनाने पीक कापणी प्रयोगाअंती मंडळनिहाय ३३ टक्क्यावर बाधित क्षेत्राला ‘एनडीआरएफ’ निकष ग्राह्य धरून मदतीचा निर्णय जाहीर केला होता.

ठळक मुद्देगुलाबी बोंडअळीचे नुकसान : जिल्ह्यात २.२० लाख शेतकऱ्यांना १८३ कोटींची मिळणार मदत

आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंडअळीच्या नुकसानासाठी शासनाने पीक कापणी प्रयोगाअंती मंडळनिहाय ३३ टक्क्यावर बाधित क्षेत्राला ‘एनडीआरएफ’ निकष ग्राह्य धरून मदतीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, जिल्ह्यासह राज्यात याला कडाडून विरोध झाल्याने १७ मार्चला शासनाने जुना निर्णय अधिक्रमित केल्याने आता जुन्याच निकषानुसार २ लाख २० हजार २६५ शेतकºयांना १८२ कोटी ६० लाखांची मदत मिळणार आहे.शासनाच्या ७ डिसेंबरच्या आदेशान्वये जिल्ह्यात बोंड अळीमुळे ३३ टक्क्यांवर बाधित क्षेत्राचे संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १८३ कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला. आता १७ फेब्रुवारीला महसूल विभागाने पीक कापणी प्रयोगानंतर मंडळनिहाय अहवाल मागविला. यामध्ये १०२ कोटींचे नुकसान दाखविण्यात आले. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संतप्त झाले. त्यामुळे शासनाने हा निर्णय अधिक्रमित केला. या निर्णयाने पाच तालुक्यांतील शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले. यावर आ. यशोमती ठाकूर व आ. वीरेंद्र जगताप यांनी जिल्हाधिकाºयांना जाब विचारला होता तसेच हा मुद्दा विधानसभेत लावून धरला होता.सात फेब्रुवारीच्या आदेशानुसार जिल्हास्थितीशासनाने ७ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन ३३ टक्क्यांवर बाधित कपाशीचा संयुक्त स्वाक्षरीसह शेतकºयांना मदतीसाठी आवश्यक निधीचा अहवाल मागितला. यासाठी बाधित पिकांत शेतकरी उभा असलेले ‘जीपीएस’ इनबिल्ट फोटो मोबाइल अ‍ॅपच्या साहाय्याने काढण्यात आले. यामध्ये २,२०,२६५ शेतकºयांच्या २,२२,५८६ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १,९९,१७२ हेक्टरमधील कपाशी बाधित झाले असल्याचे निष्पन्न झाले.१७ फेब्रुवारीच्या आदेशान्वये जिल्हास्थितीमहसूल विभागाने १७ फेब्रुवारीला पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन पीक विमा योजनेंतर्गत कपाशीचे पीक कापणी प्रयोगाअंती ३३ टक्क्यांवर बाधित मंडळाचा अहवाल मागितला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ४६ महसूल मंडळांत १ लाख १९ हजार ४१० शेतकऱ्यांच्या १ लाख १० हजार ९०० हेक्टर क्षेत्रात ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याने १०३ कोटी ६४ लाख २ हजार ५९० रुपयांच्या निधीची मागणी केली होती.