शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शहानूरच्या पाण्यावर शेजारच्या तालुक्याचा डोळा

By admin | Updated: April 29, 2016 00:19 IST

यावर्षी सर्वच जलाशयांची पातळी झपाट्याने खालावली आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या सरासरी १७ टक्केच पाणीसाठा आहे.

धरणाची होणार का पाणेरी ? : मूर्तिजापूर, अकोटला पाणी देण्यावर मंथनसुदेश मोरे अंजनगाव सुर्जीयावर्षी सर्वच जलाशयांची पातळी झपाट्याने खालावली आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या सरासरी १७ टक्केच पाणीसाठा आहे. यापेक्षाही भयावह परिस्थिती अकोला जिल्ह्याची आहे. या जिल्ह्यातील मूर्तिजापूर आणि अकोट ही शहरे कायम तहानलेली आहेत. शहानूर धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या दर्यापूर आणि अंजनगाव तालुक्यांच्या सीमेवरील ही गावे संपूर्ण टँकर पुरवठ्यावर चालतात. यामुळे शहानूर पाणीपुरवठा योजनेतून या शहरांना पाणी देता येईल काय ? याची उच्च पातळीवर चाचपणी सुरूू असून तांत्रीकदृष्टया याबाबत शक्यता पडताळून पाहिली जात आहे. यामुळे सद्यस्थितीत या योजनेवर असलेला ताण वाढून ही योजनाच कोलमडून पडण्याची भिती आहे. राजकीय फायद्यासाठी या धरणाची 'पाणेरी' करण्याचा घाट उच्चपातळीवर चालू असल्याचे वृत्त आहे.१५६ गावे आणि दर्यापूर व अंजनगाव शहरांसोबतच वाढीव ७९ गावांना अविरत पाणीपुरवठा करणारे शहानूर धरण अतिरिक्त पाणीसाठा बाळगून आहे. इतर धरणे मृतप्राय झाली असतानासुद्धा या धरणात सद्यस्थितीत ४५ टक्के पाणी टक्केवारी आहे. गेल्या आॅगस्ट अखेर धरणात ३८ दशलक्ष घनमीटर पाणी होते. गेले आठ महीने त्यातील १८ दशलक्ष घनमीटर पाणी संपले तरी अजूनही २१ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. नेमक्या याच सौद्यामुळे या धरणातील पाणी शेजारच्यांना खुणावत आहे. या धरणातील पाणी मूर्तिजापूरपासून अवघ्या दहा किमी. अंतरावरील टाकळीपर्यंत जाते. कारला-काडगव्हाण मार्गावर धामणगाव चोरे हे गाव अकोट तालुक्यात येते. पण या गावाला शहानूर धरणातून पाणी पुरवठा होतो. यासाठी निमखेड आडे या अंजनगाव तालुक्यातील गावच्या नावाने रेकॉर्डवर पाण्याची टाकी आहे. टाकळीला मूर्तिजापूर जोडता येईल काय? याचासुध्दा वारंवार विचारविनिमय केला जात आहे.मूर्तिजापूरला आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. रोज दहा टँकर नागरिकांना न.प.पुरविते काटेपूर्णा धरणातून अनियमित पाणी येते. या तालुक्यातील रोहणा गावानजीकच्या उमा बॅरेज प्रकल्प रखडल्याने अजून तीन वर्षे हीच परिस्थिती राहील. अकोटचेही तेच हाल आहेत. पण नजीकचा बोर्डी नाला प्रकल्प पूर्ण व्हायला अवकाश आहे. वाण धरणातून अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. अकोटचे लोक पाण्यासाठी रात्रभर जागे असतात. त्यातूनच शहानूर धरणाकडे या शेजारच्या तालुक्यांची वक्रदृष्टी वळलेली आहे.