शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

दारुड्याच्या अंत्यसंस्कारासाठी नातलगांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 00:20 IST

जिवंतपणी दारू पिऊन कुटुंबियांना हैराण करणाऱ्या दारूड्याच्या मृत्युनंतर कुटुंबियांनी त्याच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यासही चक्क नकार दिला.

पोलिसांनी केली मनधरणी : अखेरीस जबरदस्तीने आणले इर्विनमध्येअमरावती : जिवंतपणी दारू पिऊन कुटुंबियांना हैराण करणाऱ्या दारूड्याच्या मृत्युनंतर कुटुंबियांनी त्याच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यासही चक्क नकार दिला. मात्र, शवविच्छेदनाची कारवाई व अंत्यसंस्कार करण्याचे किमान सोपस्कार तरी कुटुंबियांनी पूर्ण करावेत, यासाठी पोलिसांनी मृताच्या कुटुंबियांनी अक्षरश: मनधरणी केली. शेवटी धाक दाखवून त्यांना इर्विनमध्ये आणल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडली.बडनेरा नवीवस्तीतील गजानननगर परिसरात सोमवारी एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. बडनेरा पोलीस ठाण्याचे एएसआय दिवाकर काळबांडे व पोलीस शिपाई हितेंद्र देवपारे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून स्वखर्चाने हा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. चौकशीअंती तो मृतदेह मारोती रामाजी कुरवाळे (५०,रा.फुकटनगर, बडनेरा) याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मृताच्या भावाला पोलिसांनी माहिती दिली. मात्र, काही कामानिमित्त बाहेरगावी असल्याचे सांगून त्याने वेळ मारून नेली. त्यामुळे अन्य नातेवाईकांना इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रियेसंदर्भात पाठविण्याची विनंती पोलिसांनी मृताच्या भावाला केली. मात्र, त्याने योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलिसांनी मृताचे घर गाठून त्याच्या बहिणीशी संपर्क केला. मात्र, ‘आम्हाला मारोतीसोबत काही घेणे-देणे’ नसल्याचे सांगून त्यांनीही पार्थिव ताब्यात घेण्यासाठी नकार दिला. त्यामुळे पोलिसांसमोर पुन्हा पेच निर्माण झाला. पोलिसांनी मृताच्या अन्य नातेवाईकांची सुद्धा मनधरणी केली. मात्र, कोणीच मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पुढे आले नाही. अनोळखी मृतदेहाला तीन दिवस ठेवल्यानंतर पोलीस शवविच्छेदन प्रक्रिया आटोपतात, असा नियम आहे. मात्र, मृताचे नातेवाईक असताना त्यांच्या उपस्थितीशिवाय शवविच्छेदन करणे, बेकायदेशिर असल्याने नाईलाजास्तव पोलिसांना नातलगांची मनधरणी केली. इतकेच नव्हे तर अंत्यविधीचा सर्व खर्च करण्याची तयारी देखील दर्शविली. पोस्टमार्टमच्या दस्तऐवजांवर सह्या करा, पुढील अंत्यविधी आम्हीच करू, असे आश्वासन पोलिसांनी नातलंगाना दिले. मात्र, तरी सुुद्धा नातलग पोलिसांसोबत येण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसी खाक्या धाक दाखवून मृताच्या नातलगांना पोलीस जीपमध्ये बसवून जबरदस्तीने इर्विन रूग्णालयात आणले. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली आणि मारोती कुरवाळे यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आलेत. दारूड्याचे पार्थिव स्वीकारण्यास नातलगांनी नकार दिल्याने पोलिसांना मात्र विचित्र पेचाचा सामना करावा लागला. बडनेऱ्यातील गजाननगरात मारोती कुरवाळे नामक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला. शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना बोलविण्यात आले. मात्र, त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यांना अनेकदा विनवणी केली. मात्र, ते आले नाहीत. अखेर दुपारी पोलीस जीपमध्ये बसवून त्यांना आणावे लागले. - दिवाकर काळबांडे,सहायक पोलीस उपनिरीक्षक, बडनेरा पोलीस ठाणे.