शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

राष्ट्रवादीला ५० टक्के जागा हव्याच!

By admin | Updated: July 20, 2014 23:58 IST

येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५० टक्के जागा मिळाव्यात, असा आमचा आग्रह आहे. ही मागणी वरिष्ठांची असून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता मागणी पूर्ण होईल,

पत्रपरिषद : अनिल देशमुख यांची माहितीअमरावती : येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५० टक्के जागा मिळाव्यात, असा आमचा आग्रह आहे. ही मागणी वरिष्ठांची असून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता मागणी पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी येथील शासकीय विश्राम भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.अनिल देशमुख हे अकोला येथे जात असता त्यांनी अमरावतीतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. मतदारसंघनिहाय चर्चा करताना कोणता मतदारसंघ प्राधान्यक्रमाने राष्ट्रवादीच्या वाट्याला मागावा याविषयी पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार हे निश्चित आहे. २८८ पैकी १४४ जागा या राष्ट्रवादीच्या वाट्याला मिळाव्यात ही मागणी वरिष्ठांची आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या खासदारांच्या संख्येत महाराष्ट्रात वाढ झाली आहे. या मूल्यमापनानुसार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला निम्म्या जागा मिळायलाच पाहिजे. २३ जुलै रोजी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षश्रेष्ठींंची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मागणीनुसार जागा वाटपाचे सूत्र ठरविले जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. अमरावतीत १८ जुलै रोजी होणारा निर्धार मेळावा का रद्द करण्यात आला, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता ते म्हणाले, निर्धार मेळावा हा संपूर्ण राज्यभर आयोजित करण्यात आला होता. काही तांत्रिक कारणांमुळे मेळावा पुढे ढकलण्यात आला. जिल्हाध्यक्षपदासाठी स्पर्धा असून काही नावांवर मंथन सुरु आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत ही नावे घोषित केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अ. रवी राणा, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, विजय भैसे, उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे, नितीन हिवसे, गणेश राय, सुनील काळे, संतोष महात्मे, चंद्रशेखर देशमुख, शरद तसरे, सपना ठाकूर, प्रवीण मेश्राम, अनिल ठाकरे, नीलिमा महल्ले आदी उपस्थित होते.