शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखुडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:11 IST

अमरावती : खरिपाला सुरुवात होऊन दीड महिना झाला असला तरी राष्ट्रीयीकृत बँकांचा पीककर्ज वाटपात हात आखुडता आहे. अमरावती विभागात ...

अमरावती : खरिपाला सुरुवात होऊन दीड महिना झाला असला तरी राष्ट्रीयीकृत बँकांचा पीककर्ज वाटपात हात आखुडता आहे. अमरावती विभागात सद्यस्थितीत ४,१६,५२३ शेतकरी खातेदारांना ३,६०९ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ५२.४९ टक्केवारी आहे. यात जिल्हा बँकेचा टक्का ८४.२९ असताना व्यापारी बँकांनी लक्ष्यांकाच्या तुलनेत ३४.४५ टक्केच वाटप केलेले आहे.

विभागात अकोला जिल्हा वगळता उर्वरित जिल्ह्यात खरिपाची ८० टक्क्यांवर पेरणी आटोपली आहे. काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत बियाण्यांसह रासायनिक खतांसाठी पीककर्जाची निकड असताना राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना माघारी पाठवित आहे.

विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या अहवालानुसार जिल्हा बँकेने आतापर्यंत २,४७,६५४७ शेतकऱ्यांना ३,९८,७०० हेक्टरसाठी १,९०९.१६ कोटींचे वाटप केलेले आहे. ही सर्वाधिक ८४.२९ टक्केवारी आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३६२.६३ कोटी म्हणजेच ८९.५४ टक्के, अकोला जिल्ह्यात ४५९.२२ कोटी (८३.२४ टक्के), वाशिम जिल्ह्यात ४४९.७७ कोटी ( ७४.३४ टक्के), बुलडाणा जिल्ह्यात ३९.६५ कोटी (६०.०८ टक्के) व यवतमाळ जिल्ह्यात उच्चांकी ५९७.८७ कोटी (९३.७१ टक्के) कर्जवाटप केले आहे.

बॉक्स

जिल्हानिहाय कर्जवाटपाची स्थिती

अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत ७१६.८७ कोटी (५९.७४ टक्के), अकोला जिल्ह्यात ६७८.१४ (५९.१४ टक्के), वाशिम जिल्ह्यात ६०२.१९ कोटी ( ५८.७५ टक्के), बुलडाणा जिल्ह्यात ४५६.४७ कोटी (३५.११ टक्के) व यवतमाळ जिल्ह्यात ११५५.३२ कोटी म्हणजेच ५२.४९ टक्के कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. खरीप कर्ज वाटपाचे १०० दिवस झाले असताना व्यापारी बँकांचा वेग अद्याप वाढलेला नसल्याचे दिसून येते.