शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

गुढीपूजनासाठी नटली अंबानगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:35 IST

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. भारतीय नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्यापासून होतो. उंच काठीवर तांब्याची पालथी लोेटी, भरजरी साडी, गाठी आणि कडुनिंबाच्या डाफळीने सजलेली गुढी दारोदारी उभारून नववर्षांचे स्वागत करण्याची परंपरा आहे.

ठळक मुद्देमराठी नववर्षारंभ : घरोघरी तयारी, तरुणाई उत्साहात

आॅनलाईन लोकमतअमरावती : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. भारतीय नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्यापासून होतो. उंच काठीवर तांब्याची पालथी लोेटी, भरजरी साडी, गाठी आणि कडुनिंबाच्या डाफळीने सजलेली गुढी दारोदारी उभारून नववर्षांचे स्वागत करण्याची परंपरा आहे. पारंपरिक वेशभूषेत नटून-थटून मराठमोळ्या पद्धतीने मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरूणाईचा उत्साह यंदा ओसंडून वाहताना दिसतोय. याच उत्साहाचे पडसाद बाजारपेठेतही उमटले आहेत. बाजारपेठेतील लगबग शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.मराठी नववर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र. उन्हाने यंदा कहर केलाय. चैत्रातच उकाडा असह्य होतोय. मात्र, असह्य तापमानातसुद्धा बाजारपेठेत गर्दी दिसून येत असून विधिवत गुढी पूजनाकरिता आवश्यक पूजा सामग्रीच्या खरेदीची गृहिणींची लगबग चालली आहे.गुढीला पारंपरिक नऊवार, कोल्हापुरी नथ आणि इतर सौभाग्य साज चढवून नटविण्याचा भारीच उत्साह महिलांमध्ये दिसून येत पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सरसावलेल्या विविध संघटनांच्या सदस्यांची भगवे फेटे खरेदी करण्यासाठी गर्दी उसळत आहे. तरूणाईची गर्दी झाली आहे. गुढी पाडव्याची पहाट उगवणार ती पावित्र्य, आनंद, उत्साह आणि जल्लोषाची गुढी घेऊनच.