शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नाले सफाई, नाल्यांची केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

अमरावती : पावसाळा सुरू होऊन दीड महिना होऊन गेला असताना बहुतेक प्रभागांमधील नाल्या, कच्च्या नाल्यांची सफाई झालेली नाही. ...

अमरावती : पावसाळा सुरू होऊन दीड महिना होऊन गेला असताना बहुतेक प्रभागांमधील नाल्या, कच्च्या नाल्यांची सफाई झालेली नाही. प्रशासनाचा जोर फक्त नाले सफाईवर असल्याने व आता मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असल्याने कीटकजन्य रोगांच्या आजारात वाढ झालेली आहे. स्वच्छतेवर पदाधिकाऱ्यांचे मौन असल्याने प्रशासन ढिम्म आहे. स्वच्छता कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

महापालिका क्षेत्रात १६ मोठे नाले व १८ हून अधिक उपनाले आहेत. पावसाळ्यापूर्वी या नालेसफाईला वेग यावा, यासाठी कंत्राटे दिली जातात. मात्र, शहरात असलेल्या लहान नाल्या व कच्च्या नाल्यांच्या सफाईचा विसर कंत्राटदारांना पडतो. त्यामुळे पाणी तुंबून गटार रस्त्यावर येत असल्याची स्थिती आऊटस्कड भागात आहे. या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक लिक्विड टाकले जात नाही तसेच बहुतेक भागात धूरळणी व फवारणी फक्त फोटोसेशनपुरतीच केल्या जात असल्याची स्थिती आहे. स्थायी समितीचे माजी सभापती मिलिंद बांबल यांनी या समस्येकडे आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

प्रत्येक प्रभागातील नाल्यांची सफाई, कंटेनरची स्वच्छता, त्यालगतचा कचरा उचलणे महत्त्वाचे आहे. शहरात रिकाम्या प्लॉटमध्ये झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात वाढतात. प्लॉटमालकांना नोटीस देऊन रिकामे प्लॉट साफ करण्यास सांगितले जात नसल्याने शहरात दिवसेंदिवस अस्वच्छता व कचऱ्यांचे ढीग वाढत असल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

आयुक्तांचे आदेश, अंमलबजावणी केव्हा?

महापालिकेच्या मंगळवारच्या आमसभेत आयुक्तांनी हा विषय गंभीरतेने घेत प्रत्येक प्रभागातील सफाई कंत्राटदार, आरोग्य अधिकारी, स्वच्छता अधिकारी, स्वास्थ्य निरीक्षक, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, बीट प्यून यांच्या नावासह मोबाईल नंबरची यादी त्वरित जाहीर करण्याचे आदेश दिले. काही समस्या असल्यास नागरिकांना तक्रार करणे सोयीचे होणार आहे. मात्र, यावर अंमलबजावणी केव्हा, हा खरा प्रश्न आहे.

बॉक्स

स्वच्छतेवर महिन्याकाठी २.५० कोटींचा खर्च

महानगरपालिकेकडून सर्वांत जास्त खर्च आरोग्य व स्वच्छता विभागावर होत आहे. तसे पाहता, प्रत्येक प्रभागात दरमहा ९ ते १० लाखांचा खर्च करण्यात येतो. म्हणजेच अडीच कोटींवर खर्च स्वच्छतेवर होत असताना परिणाम कितीसा साध्य होतो, हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्येक प्रभागातील या समस्येवर आतापर्यंत एकही पदाधिकारी किंवा नगरसेवकांची चुप्पी का, हा नागरिकांचा सवाल आहे.

कोट

प्रत्येक प्रभागातील नियमित स्वच्छता व्हावी, यासाठी नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने स्वच्छता कंत्राटदार व संबधितांचे संपर्क क्रमांक तात्काळ जाहीर करण्याचे व कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका