शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नागठाणा प्रकल्पातून

By admin | Updated: April 12, 2015 00:28 IST

तालूक्यात दरवर्षी चुडामण नदीवर असलेल्या नागठाणा १ आणि २ या प्रकल्पातून पाणी सोडले जाते. ...

लाखो लिटर पाण्याचा अपव्ययवरूड : तालूक्यात दरवर्षी चुडामण नदीवर असलेल्या नागठाणा १ आणि २ या प्रकल्पातून पाणी सोडले जाते. यामुळे बंधारे, विहिरी तसेच जलसाठे कोरडे होत नाही. याकरीता चुडामण नदीमध्ये तीन दिवसांपासून नागठाणा २ या प्रकल्पातून पाणी सोडले. परंतु अधिक काळ लोटूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेले गेट बंद होत नसल्याने सर्व प्रयत्न असफल झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला गेट बंद करण्याची मागणी केली. मात्र पाण्याचा विसर्ग सुरुच असल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तालुक्यातील नदी, बंधारे, विहिरींमध्ये जलस्तर कायम राहावा आणि पाणी टंचाई निर्माण हाऊ नये म्हणून दरवर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मध्ये पाणी सोडण्यात येते. यावर्षी नदीकाठच्या झटामझिरी, तिवसा, पिंपळशेंडा, वरुड, राजुराबाजार, वाडेगाव, काटी, गाडेगावासह आदी गावालगतच्या शेतातील विहिरंची भूजल पातळी घटली होती. सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यामुळे नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. आ. अनिल बोंडे यांच्याकडेसुध्दा मागणी केल्याने आमदारांनी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला. यामुळे ेचुडामण नदीत पाणी सोडण्यात आले. परंतु ठरावीक कालावधीनंतर गेट बंद करणे आवश्यक असते. परंतु इनटेक विहिरींच्या गेटमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने सदर गेट बंद होत नाही. पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र तारेवरची कसरत करुन गेट बंद झाले नाही. यामुळे लाखो लिटर पाण्याचा विसर्ग सुरुअसल्याने प्रकल्पातील जलसाठा सेंकदागणिक कमी होत आहे. प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासूनच या गेटमध्ये तांत्रिक बिघाड आहे. या प्रकल्पाचे परिसरात असलेल्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचे सावट पसरले आहे. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन तातडीने गेट बंद करण्याची मागणी केली आहे. वृत्त लिहिपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरुच होता. गेट बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपडसुध्दा सुरु होती, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)नागरिकांच्या मागणीवरुन गेट उघडले होतेपाटंबणारे विभागाचे अभियंता देशपांडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्कसाधला असता आम्ही प्रकल्पाचे गेट बंद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून आज गेट बंद होईल, असे सांगितले. काटी, वाडेगावच्या नागरिकांच्या मागणीवरुनच गेट उघडण्यात आल्याचेही अभियंता देशपांडे यांनी सांगितले.