शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुंगसांच्या हल्ल्यात नाग जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:30 IST

तपोवन रोडच्या मधोमध दोन मुंगसांनी नागाला घेरले होते. त्यांच्यातील लढाईचा थरार पाहण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

ठळक मुद्देसर्पमित्रांकडून जीवदान : तपोवन मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तपोवन रोडच्या मधोमध दोन मुंगसांनी नागाला घेरले होते. त्यांच्यातील लढाईचा थरार पाहण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मुंगसांच्या हल्ल्यात नागाच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. तेथे पोहोचलेल्या सर्पमित्रांनी नागावर उपचार करून त्यास जीवदान दिले.तपोवन गेटच्या आतील रस्त्यावरील नाल्याजवळ दोन मुंगूस आणि एका नागाची आमनसामने लढाई सुरू होती. मुंगूस नागावर हावी होत होते, तर नाग फणा काढून त्यांचा हल्ला परतवत होता. ही लढाई त्या मार्गाने जाणारे नागरिकांचे कुतूहलाने पाहत होते. बघ्यांची गर्दी वाढल्यावर झालेल्या गोंधळामुळे दोन्ही मुंगसांनी पळ काढला. मुंगसाच्या हल्ल्यात नागाच्या जबड्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने तो तेथून दूर जाऊ शकला नाही. या घटनेची माहिती त्याच परिसरातील रहिवासी सर्पमित्र भूषण गवळींना मिळाली. त्यांनी तत्काळ कार्स या प्राणिमित्र संस्थेचे पदाधिकारी चेतन भारती यांना कळविले.चेतन भारती यांनी त्यांचे सहकारी शुभम गिरी, अक्षय देशमुख, अभय साखरकर, शुभम भोमे, अनुराग बाराहाते यांनी घटनास्थळी पाठविले. त्यांनी जखमी नागाला ताब्यात घेऊन वन्यजीव अभ्यासक व कार्सचे पदाधिकारी राघवेंद्र नांदे यांच्याकडे नेले. त्यांनी नागाची स्थिती पाहून सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी अशोक किनगे यांच्याकडे उपचारासाठी पाठविले. यावेळी चेतन भारती, अक्षय निखरे, सिराज तेथे उपस्थित होते. किनगे यांनी नागाच्या फाटलेल्या तोंडाच्या खालच्या जबड्याला दोन टाके लावले, तसेच जबड्याचे ड्रेसिंग करून इंजेक्शन दिले. त्यानंतर नागाला चेतन भारतीच्या स्वाधीन केले. शनिवारी सापाला पुन्हा ड्रेसिंगकरिता किनगे यांच्याकडे नेले होते.कवड्या सापाला सोडले जंगलातपोटे टाऊनशिपजवळ जखमी अवस्थेत आढळून आलेल्या कवड्या सापाला कार्सच्या सर्पमित्रांना जीवनदान देऊन शनिवारी जंगलात सोडले. त्या सापाच्या अंगावरून वाहन गेल्याने तो जखमी झाला होता. उपचारानंतर तो साप पूर्णपणे बरा झाला असून, आता त्या सापाला जंगलात सोडण्यात आले आहे.