शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रमजानच्या सामूहिक आनंदाला यंदाही मुकणार मुस्लिम बांधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:12 IST

चांदूर बाजार : रमजान हा मुस्लिम समाजाचा अत्यंत पवित्र महिना. मुस्लिम बांधवांच्या या पवित्र उत्सवाच्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली. ...

चांदूर बाजार : रमजान हा मुस्लिम समाजाचा अत्यंत पवित्र महिना. मुस्लिम बांधवांच्या या पवित्र उत्सवाच्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट पसरले आहे. यावर्षीही शासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्वांसाठी कडक निर्बंध लादले आहेत. परिणामी मुस्लिम समाजाला आपल्या सर्व धार्मिक विधी घरच्या घरीच पार पाडाव्या लागतील. सणाच्या सामूहिक आनंदाला मुस्लिम समाज यंदाही मुकणार आहे. कोरोनाचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत आहे.

मुस्लिम समाजात रमजान महिना हा धार्मिकदृष्ट्या पवित्र महिना गणला जातो. या महिन्यात सर्वच आबालवृद्ध खुदाची विशेष इबादत करतात. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये सर्वदूर आनंदाचे वातावरण असते. मुस्लिम कॅलेंडरनुसार नववा असलेला हा महिना खुदाच्या इबादतचा पवित्र महिना म्हणून मानला जातो. या महिन्यात लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्व जण आपल्या शारीरिक ऐपतीप्रमाणे निर्जला उपवास करतात. त्यांचा हा उपवास दररोज सूर्योदयापूर्वी सुरू होतो, तर सूर्यास्ताला संपतो. त्यावेळी मुस्लिम बांधव एकत्र येऊन दररोज इफ्तार साजरी करतात. रमजान महिनाभर दररोज रात्रीला मुस्लिम बांधव तरावीहची विशेष नमाज अदा करतात. त्यासोबतच दररोज कुराण पठण करून इतरही धार्मिक विधी सातत्याने पार पाडतात. रमजान महिन्याच्या पवित्र पर्वाचा समारोप ईदच्या दिवशी केला जातो. यावेळी मुस्लिम बांधव एकमेकांना गळाभेट देतात. परंतु, कोरोनाने या सणाच्या आनंदावर गतवर्षी विरजण पडले. यंदाही तीच स्थिती आहे.

रमजान महिन्यात पहाटेच्या सहेरीपासून सुर्यास्ता नंतरच्या इफ्तारकरिता लागणाऱ्या विविध खाद्यपदार्थांच्या

खरेदीसाठी शहरातील बाजारपेठ खुली झालेली नाही. त्यातच कोरोनामुळे घरच्या घरी नमाज अदा करण्यास सांगण्यात आले आहे. चिमुकलेही कोरोनाने उद्भवलेल्या स्थितीने हिरमुसले आहेत.

--------

कोट येत आहे.