शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
3
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
4
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
5
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
6
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
7
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
8
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
9
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
10
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
11
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
12
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
13
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
14
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
15
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
16
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
17
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
18
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
19
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
20
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 

‘आक्रमण’च्या सुनील गजभियेविरुद्ध खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:44 IST

एक्स्प्रेस हायवेवरील एका विहिरीत आढळलेला मृतदेह सामाजिक कार्यकर्ती शीतल पाटील हिचा असल्याचे शुक्रवारी उशिरा रात्री स्पष्ट झाले.

ठळक मुद्दे‘तो’ मृतदेह शीतल पाटीलचा : रहमत खाँचाही सहभाग, अंतिम शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

आॅनलाईन लोकमतअमरावती : एक्स्प्रेस हायवेवरील एका विहिरीत आढळलेला मृतदेह सामाजिक कार्यकर्ती शीतल पाटील हिचा असल्याचे शुक्रवारी उशिरा रात्री स्पष्ट झाले. शवविच्छेदन अहवाल व नातेवाईकांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध हत्या व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा शनिवारी नोंदविला. आक्रमण संघटनेचे संघटक प्रमुख अ‍ॅड. सुनील शामराव गजभिये याच्यासह रहेमत खाँ पठाण यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.शुक्रवारी दुपारी एका ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह एक्स्प्रेस हायवेलगतच्या विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. विहिरीत आढळलेल्या चिठ्ठीत आईच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. या अनुषंगाने गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, उशिरा रात्री नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटविली आणि त्यांनी हत्येचा संशय व्यक्त केला.शीतल ‘आक्रमण’ संघटनेची जिल्हाध्यक्षपोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल अरुण पाटील (डुकरे) (३२,रा.विलासनगर) ही तिच्या शामल नामक बहिणीच्या घरी आई व तिच्या आठ वर्षीय मुलीसोबत राहात होती. तिचा २०१२ मध्ये बुलडाणा येथे विवाह झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर ती विलासनगर येथे बहिणीकडे राहायला आली. तिच्या बहिणीचाही काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. तिचा सावत्र भाऊ वैभव बन हा परतवाडा येथे राहतो. शीतलने वसुंधरा फाऊन्डेशन या एनजीओसोबत विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतला. तसेच अ‍ॅड. सुनील गजभिये याचे सहायक म्हणून तिने कामकाज पाहिले. शीतलला सामाजिक कार्याची आवड असल्याने तिने गजभियेच्या आक्रमण संघटनेत जिल्हाध्यक्षपद हिरीरीने सांभाळले. अखेर त्याच गजभियेवर तिच्या हत्येचा आरोप आहे.सुनील गजभिये तीन दिवसांपासून गायबअ‍ॅड. सुनील गजभिये हे स्थानिक न्यायालयात वकिली व्यवसाय करीत असताना शीतल पाटील या त्यांना सहकार्य करीत होत्या. दोघेही मंगळवार सायंकाळनंतर कुणाच्याही दृष्टीस पडले नाहीत. इर्विन चौकातून त्यांचा थांगपत्ता लागला नाही. मंगळवारपासून गजभियेचा मोबाईल बंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.‘आक्रमण’च्या मूळ उद्देशालाच हरताळआॅटोचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुनील गजभिये यांनी आक्रमण संघटनेची स्थापना केली. मात्र, त्यांच्या बहूतांश आंदोलनावर संशयकल्लोळ निर्माण झाला होता. या संघटनेच्या अन्य एका पदाधिकाऱ्याविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. गजभियेच्या आंदोलनात शीतल पाटील हिने सक्रीय सहभाग नोंदविला. मात्र, शनिवारी शवागारासमोर या संघटनेचे अन्य कार्यकर्ते उपस्थित असताना गजभियेची अनुपस्थिती संशयाला पुरक ठरली.शवविच्छेदनात इंटर्नल हेड इंज्यूरी असल्याचे प्रथमत: दिसून येत आहे. शवविच्छेदनाचा हा प्राथमिक अहवाल पोलिसांना देण्यात आला.- श्यामसुंदर निकम,जिल्हा शल्यचिकित्सकशीतल पाटील हिच्या मृत्यू प्रकरणात तिच्या भावाने तक्रार नोंदविली. त्यानुसार दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला.- मनीष ठाकरे,ठाणेदार, गाडगेनगर ठाणे