शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूक होणार प्रभाग पद्धतीने

By admin | Updated: January 18, 2016 00:11 IST

सन २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका दोन किंवा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सरचिणीस रामदास आंबटकर यांनी येथे रविवारी दिली.

संवाद : भाजप प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांची माहितीअमरावती : सन २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका दोन किंवा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सरचिणीस रामदास आंबटकर यांनी येथे रविवारी दिली.भाजप कार्यालयात पार पडलेल्या भाजपा अध्यक्षपदाचीनिवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आंबटकर यांच्या मते, भाजपच्या वरिष्ठांचे महापालिका निवडणूक प्रभागपद्धतीने घेण्याबाबत एकमत केले आहे. प्रभाग पद्धतीची निवडणूक दोन किंवा चार सदस्यीय प्रणालीने घ्यावी, हे वॉर्ड रचनेनुसार ठरविले जाईल. मात्र, नगरपरिषदांच्या निवडणुकादेखील प्रभाग पद्धतीने होतील. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जातील. परंतु महापालिका निवडणुकीत थेट जनतेतून महापौर निवडण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्याचे देखील त्यांनी मान्य केले. प्रभागपद्धतीने पक्षात बंडाळी, अंतर्गत हेवेदाव्यांना पूर्णविराम तर अपक्षांना फार वाव मिळत नाही, त्यामुळेच भाजपने महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणपणे महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होतील. प्रभाग पद्धतीेने राजकीय पक्षाला वाव मिळत असून पक्षाचे ध्येय, धोरण लागू करता येते हे यापूर्वी झालेल्या प्रभागपद्धती निवडणुकीचा दाखला देताना त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग पद्धतीच्या निवडणुकीत महापालिकेत राजकीय पक्षाचे वर्चस्व राहात असून अपक्ष सदस्यांच्या दबावतंत्र वापरण्याच्या खेळीला लगाम मिळतो, ही बाब सुद्धा आंबटकर यांनी बोलून दाखविली. महापालिका लोकसंख्येच्या आधारावर दोन किंवा चार सदस्यीय प्रभाग प्रणालीची निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार, असे रामदास आंबटकर म्हणाले.