शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

रेन हॉर्वेस्टिंगसाठी नगरपरिषद, महापालिकेला सक्तीचे आदेश

By admin | Updated: June 20, 2016 00:03 IST

पावसाच्या पाणी संचयाचे आवाहन करीत जनतेला विविध उपययोजना करायला लावणाऱ्या राज्य सरकारच्या आवाहनाला शासकीय विभागाकडून प्रतिसाद नसल्याचे पुढे आले आहे.

सूचना : पावसाचे पाणी बचतीसाठी उपाययोजनाअमरावती : पावसाच्या पाणी संचयाचे आवाहन करीत जनतेला विविध उपययोजना करायला लावणाऱ्या राज्य सरकारच्या आवाहनाला शासकीय विभागाकडून प्रतिसाद नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून शासकीय इमारतींमध्येही या उपाययोजना असाव्यात, असा आग्रह करणाऱ्याला शासनालाच पुन्हा एकदा याचे गांभीर्य लक्षात घेता आदेश काढावा लागला आहे. नगरविकास विभागाकडून नव्याने काढलेल्या आदेशानुसार नगरपरिषद, महापालिकांच्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या उपाययोजना करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंबंधीचे आदेश सर्व महापालिकांना पाठविण्यात आल्याची माहिती आहे. राज्यभरातून अलीकडच्या काही वर्षांत निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेता या संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने अनेक पावले उचलली होती. यामध्ये पावसाळ्यात छतावरून वाहून जाणाऱ्या पाण्याचा संचय करून त्याद्वारे विहिरी किंवा कृत्रिम टाक्याची निर्मिती करून त्यात पाणी साठवून ठेवण्याला प्राधान्य देण्यात येऊ लागला. ऐन वॉटर हार्वेस्टिंगमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी मदत होेते. पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता राज्य सरकारने यासंदर्भात शासनाच्या विविध विभागांनाही यांच्या इमारतीमध्ये उपापयोजना कराव्यात, अशा सूचना २००७ मध्येच केल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे एकीकडे शासनाच्या विभागाद्वारेच रेन वॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात दुर्लक्ष करण्यात आले आहे. दुसरीकडे मात्र महापालिका हद्दीत नव्याने निर्माण होत असलेल्या इमारतींमध्ये या उपाययोजना करण्याची सक्ती केली नाही. या उपाययोजना न करणाऱ्या इमारतींचा नकाशाच मंजूर न करण्याची कार्यवाहीची तरतूदही यात करण्यात आली आहे. दरम्यान असे असले तरी नगरपालिका व महापालिकांच्या काही इमारतीतच या उपाययोजनांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे नगरविकास विभागाने आता नगरपरिषदेच्या आणि महापालिकेच्या इमारतीकडे या इमारतीची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)