शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची आमसभा तहकूब

By admin | Updated: June 19, 2016 00:09 IST

माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या निधनाप्रती शोकसंवेदना व्यक्त करीत शनिवारी आमसभा तहकूब करण्यात आली.

डहाकेंप्रती शोकसंवेदना : सर्वपक्षीयांची श्रद्धांजलीअमरावती : माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या निधनाप्रती शोकसंवेदना व्यक्त करीत शनिवारी आमसभा तहकूब करण्यात आली. ही आमसभा आता २३ जून रोजी घेतली जाणार आहे. महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शनिवारी सकाळी ११ वाजता आमसभेला सुरुवात झाली. बांधकाम विभागाशी संबंधित विषयावर चर्चा झाल्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक विलास इंगोले यांनी दिगंबर डहाके यांच्या निधनाप्रती तीव्र शोक व्यक्त करीत शोक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी अनुमोदन दिले. दिगंबर डहाके हे चौथ्यांदा महापालिकेत प्रतिनिधीत्व करीत असताना या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वावर काळाने झडप घातली. जनसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती होती, अशा शब्दांत राकाँ फ्रंटचे गटनेते चेतन पवार यांच्यासह स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, संजय अग्रवाल, प्रदीप बाजड, राजेंद्र तायडे, नीलिमा काळे, सुजाता झाडे, तुषार भारतीय, गुंफा मेश्राम, अजय गोंडाणे, मिलिंद बांबल, चंदुमल बिल्दानी, जयश्री मोरे, कांचन ग्रेसपुंजे, प्रकाश बन्सोड, विजय नागपूरे, सुनील काळे, प्रदीप दंदे, अ. रफिक, वनिता तायडे आदींनी डहाकेंप्रती संवेदना व्यक्त केल्या. डहाकेंच्या निधनाने स्पष्टवक्ता, निडर, निर्भय असा ज्येष्ठ सहकारी आणि उमद्या नेतृत्वाला अमरावतीकर मुकल्याची भावना सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केली. दोन महिन्यांपूर्वी आमसभेत त्यांनी केलेल्या शाब्दिक फटकेबाजीलाही अनेक नगरसेवकांनी उजाळा दिला. तत्कालीन आयुक्तांबरोबर आमसभेत त्यांची चांगलीच जुगलबंदी झाली होती, अशी आठवण काढत मर्दांच्या शहरातून मर्द निघून गेलाय, अशा भावना व्यक्त करण्यात आल्यात. आक्रमक आणि लढवय्या असलेल्या डहाकेंच्या निधनाची बातमी ‘शॉकिंग न्युज’ होती. डहाके असे अर्ध्यावरच जातील, अशी कल्पनाही न करवत असल्याने अनेकांकडून खात्री केली व त्यानंतर धक्काच बसला, अशी संवेदना महापौर रिना नंदा यांनी व्यक्त केली व त्यानंतर आमसभा तहकूब करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. (प्रतिनिधी)