शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे ज्येष्ठांसाठी ‘मिशन व्हॅक्सिनेशन’ माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:12 IST

अमरावती : महापालिका प्रशासनाने ज्येष्ठांसाठी ‘मिशन व्हॅक्सिनेशन’ मोहीम आरंभली आहे. शुक्रवारी शहरात नव्याने सहा लसीकरण केंद्रे सुरू केले. त्यामुळे ...

अमरावती : महापालिका प्रशासनाने ज्येष्ठांसाठी ‘मिशन व्हॅक्सिनेशन’ मोहीम आरंभली आहे. शुक्रवारी शहरात नव्याने सहा लसीकरण केंद्रे सुरू केले. त्यामुळे आता ४५ वर्षांवरील को-मॉर्बेडिटी रूग्ण आणि ज्येष्ठांना लसीकरण करणे सुकर होणार आहे.

महापालिकेतर्फे डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय व दंत महाविद्यालय येथे ज्‍येष्‍ठांसाठी लसीकरण सुरू करण्‍यात आले आहे. शुक्रवारी नव्‍याने आयसोलेशन दवाखाना दसरा मैदान, बडनेरा येथे मोदी हॉस्‍पिटल, भाजीबाजार येथील शहरी आरोग्‍य केंद्र महेंद्र कॉलनी, शहरी आरोग्‍य केंद् दस्‍तुरनगर, मनपा शाळा नागपुरी गेट हे सहा केंद्र सुरू करण्‍यात आले आहे. या मोहिमेला गतिमान करण्यासाठी महापौर चेतन गावंडे यांच्‍या उपस्थितीत भाजीबाजार येथे आझाद हिंद मंडळाचे सभासद प्रकाश संगेकर व नीळकंठ मंडळाचे सभासद प्रमोद गंगात्रे यांना लस देऊन मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी आयुक्‍त प्रशांत रोडे, माजी महापौर विलास इंगोले, विवेक कलोती, नगरसेवक आशिष अतकरे, उपायुक्‍त रवि पवार, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी विशाल काळे उपस्थित होते.

बडनेरा स्थित मोदी हॉस्पिटल येथे माजी मुख्याध्यापक भास्करराव कुळकर्णी यांना लस देऊन कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर चेतन गावंडे, आयुक्त प्रशांत रोडे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी नगरसेवक प्रकाश बनसोड, गंगा अंभोरे, मोहम्मद इमरान, सहायक आयुक्‍त विशाखा मोटघरे, सई कुळकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. शहरी आरोग्‍य केंद्र दस्‍तुरनगर येथे लस घेऊन सदर केंद्राच्‍या लसीकरण मोहिमेत मराठी साहित्‍य संमेलनाचे माजी अध्‍यक्ष वसंत आबाजी डाहाके यांनी सहभाग नोंदवला. यावेळी प्रभा गणोरकर, नानक आहुजा यांनीही लस घेतली. यावेळी नगरसेवक ऋषी खत्री, मोना चिमोटे, सहायक आयुक्‍त नंदकिशोर तिखिले, प्रतिभा आत्राम उपस्थित होत्‍या.

-------------------