शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

महापालिका घेणार आरक्षित जागा ताब्यात

By admin | Updated: December 23, 2015 00:07 IST

शहरविकास आराखड्यात आरक्षित जागा भूधारकांकडून ताब्यात घेण्याची महापालिका प्रशासनाने तयारी चालविली आहे.

स्थायीकडे पाठविला प्रस्ताव : अर्थसंकल्प शिर्षातून निधीची तरतूदअमरावती : शहरविकास आराखड्यात आरक्षित जागा भूधारकांकडून ताब्यात घेण्याची महापालिका प्रशासनाने तयारी चालविली आहे. अर्थसंकल्प शिर्षातील निधीच्या तरतुदीतून भूसंपादन केले जाणार आहे. त्यामुळे भूधारकांना पुढे करुन आरक्षित जागेचा ’गेम’ करण्याची शक्कल लढविणाऱ्या काही बिल्डर्स लॉबीला या निर्णयामुळे चपराक बसणार आहे. महापालिका प्रशासन अभिन्यास मंजूर करताना त्या जागेवर विकास आरक्षण नमूद करुन ठेवते. त्यानुसार आरक्षित जागेवरील आरक्षण विकसित करुन नागरिकांना त्याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेत निधी उपलब्ध होत नसल्याने विशिष्ट कालावधीनंतर आरक्षित भूधारक नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १२७ नुसार या जागेचा मोबदला अथवा ती जागा परत करण्यासाठी नोटीस बजावतो. महापालिकेत निधी नसल्यामुळे आतापर्यंत आरक्षित जागा भूधारकांना परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यापूर्वी महासभेत झालेल्या निर्णयानुसार आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी स्वतंत्र शिर्षातून ती रक्कम खर्च करावी, असा ठराव मान्य करण्यात आला. त्यानुसार आरक्षित सात जागा ताब्यात घेण्यासाठी भूधारकांना १७.०५ कोटी रुपये अदा करण्याबाबत प्रशासनाने स्थायी समितीच्या निर्णयासाठी हा विषय पाठविला आहे. परिणामी स्थायी समिती आरक्षित जागा संपादन करण्यासाठी पुढे येते अथवा प्रशासनाने पाठविलेला प्रस्ताव फेटाळून लावते, याक डे लक्ष लागले आहे. आरक्षित जागा अतिशय मोक्याच्या ठिकाणी असून या जागांचे बाजारमूल्य कोट्यवधींच्या घरात आहेत. समायोजित आरक्षण विक सित व्हावेआरक्षित जागांचा विकास करायचा झाल्यास निधीची अडचण येत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने हे आरक्षण सामाजिक संस्था अथवा शैक्षणिक संस्थांच्या पुढाकाराने विकसित केल्यास आर्थिक बोजा पडणार नाही. किंबहुना आरक्षित जागेवर त्याच स्वरुपाचे आरक्षण विकसित करणे सुकर होईल, असे माजी स्थायी समिती सभापती चेतन पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आरक्षित जागा परत न करता त्यांचा विकास करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा भविष्यात खेळाचे मैदान, संकुल, उद्याणे कशी व कोठे साकारणार, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.अशी आहेत भूसंपादनाची प्रकरणेमौजे सातुर्णा सर्व्हे क्र. ३/१ मध्ये आरक्षण क्र. ४३३ प्राथमिक शाळा तसेच आरक्षण क्र. ४३६ खेळाचे मैदान ( एकूण जागा १.९० हेक्टर आर) अग्रीम ठेव- ८,७९, ७७, ८८० रुपये, मौजा रहाटगाव सर्व्हे क्र. ७३ मध्ये आरक्षण क्र. ९६, प्राथमिक शाळा तसेच आरक्षण क्र. ९७ मध्ये खेळाचे मैदान (एकूण जागा ०.५४ हेक्टर आर) अग्रीम ठेव- २२,५७, ०८८, मौजा सातुर्णा सर्व्हे क्र. ६/२ भूखंड क्र. १, २, ३, ४, ५, ६ व ८ मध्ये आरक्षण क्र. ४३७ मध्ये क्रीडा संकुल (एकूण जागा २३, २४० चौरस फूट) अग्रीम ठेव १, ४५, ६१, २९४, मौजा सातुर्णा सर्व्हे क्र. ६/२ भूखंड क्र. ४ मध्ये आरक्षण क्र. ४३७ क्रीडा संकुल ( एकूण जागा ३३४ चौरस मिटर) अग्रीम ठेव ३३,९८, ७८४मौजे निंभोरा खुर्द सर्व्हे. क्र.५२/१ अ मधील आरक्षण क्र. ४१४ दुकान केंद्र ( एकूण जागा ०. ३३ हेक्टर आर ) अग्रीम ठेव १,९६. ४५, ५८४मौजा अकोली सर्व्हे. क्र. १३८ आरक्षण क्र. ४२९ अ मध्ये भाजीबाजार व आरक्षण क्र. ४३० मध्ये हायस्कूल ( एकूण जागा १.६८ हेक्टर आर.) अग्रीम ठेव ३, ४८, ८७, ७८०बडनेरा सर्व्हे क्र.१३८मध्ये आरक्षण क्र. ३२१ हायस्कूल व आरक्षण क्र.३२२ दवाखाना, आरक्षण क्र. ३२३ प्रसूतीगृह ( एकूण जागा ०. ६५ हेक्टर आर) अग्रीम ठेव ७७, ८६, ५४८