शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

एम.एस. रेड्डी हाजीर हो... महिला आयाेगाने पाठविले समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:14 IST

महिला व बालकल्याण मंत्री यांचा पुढाकार, दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी आयोेग गंभीर अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा ...

महिला व बालकल्याण मंत्री यांचा पुढाकार, दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी आयोेग गंभीर

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांना सोमवारी रात्री राज्य महिला आयोगाने समन्स पाठवून हजर राहण्याचे निर्देश दिले. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने ही कारवाई महिला आयोगाने आरंभली आहे. हरिसाल येथील दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी आता महिला आयोगाने कठाेर पावले उचलली आहेत.

आरएफओ दीपाली चव्हाण यांनी गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचा कंटाळून २५ मार्चला रात्री साडेसातच्या सुमारास गोळी झाडून आत्महत्या केली. दीपाली यांनी चार पानांची सुसाईड नाेट लिहून ठेवली आहे. त्यात विनोद शिवकुमार याने कशाप्रकारे त्रास दिला, ॲट्रासिटी दाखल करण्यात त्याने कशा पुढाकार घेतला, जंगलात पायी चालविल्याने गर्भपात झाला, अशा एक ना अनेक घटना दीपाली यांनी नमूद केल्या. हा सर्व प्रकार अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांना तोंडी आणि लेखी स्वरूपात अनेकदा सांगितल्या. मात्र, आयएफएस लॉबी करून रेड्डी यांनी विनोद शिवकुमार याला बळ दिले. त्यामुळे विनोद शिवकुमार याने सतत शारीरिक, मानसिक त्रास दिला.

एम. एस. रेड्डी यांनी हा प्रकार वेळीच रोखला असता, तर दीपाली चव्हाण यांना आत्महत्या करण्याचा प्रसंग ओढावला नसता, अशी भावना जनमानसांत आहे. आता विनोद शिवकुमार आरोपीच्या पिंजऱ्यात असून, रेड्डी हेदेखील तितकेच दोषी असल्याने महिला आयोगाने त्यादिशेने कार्यवाही आरंभली आहे. दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी एम. एस. रेड्डी यांनी आतापर्यंत कोणत्या उपाययोजना केल्या, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विशाखा समितीचे स्वरूप, बैठकी आणि महिला तक्रारीच्या अनुषंगाने प्रकरणांचा निपटारा आदी बाबींवर महिला आयोगाचा फोकस असणार आहे. एम. एस. रेड्डी यांना व्यक्तिश: महिला आयोगाने समन्स पाठवून बाजू मांडण्याची संधी दिली आहे.

----------------------

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला विनोद शिवकुमार आणि एम. एस. रेड्डी तितकेच दोषी आहे. कनिष्ठ महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय थांबविण्यास रेड्डी याने कुचराई केली. मर्जीतील अधिकाऱ्यांना बळ दिले. त्यामुळे ‘डॅशिंग लेडी’ दीपाली यांना आत्महत्या करावी लागली.

- यशोमती ठाकूर, महिला व बालकल्याण मंत्री