शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

देवी रुक्मिणीच्या माहेरी जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 22:57 IST

‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..’च्या गजराने विदर्भा$ची पंढरी आणि रुक्मिणीचे माहेरघर तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर दुमदुमले. सुमारे २० हजार भाविकांनी दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावली.

ठळक मुद्देकौंडण्यपूरला पाडव्याची दहीहांडीपंढरपूरहून परतलेल्या पायदळ दिंडीचे जल्लोषात स्वागत२० हजारांवर भाविकांची उपस्थिती
<p>लोकमत न्यूज नेटवर्ककौंडण्यपूर : ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..’च्या गजराने विदर्भा$ची पंढरी आणि रुक्मिणीचे माहेरघर तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर दुमदुमले. सुमारे २० हजार भाविकांनी दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावली.कौंडण्यपूर येथे पंढरपूरहून परतलेल्या पालखीचे व वारकऱ्यांचे स्वागत संस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर, सचिव सदानंद साधू, विश्वस्त अतुल ठाकरे, व्यवस्थापक काळे यांनी केले. नंतर वारकºयांनी महाप्रसाद घेतला. पाडव्याला आषाढी एकादशीची समाप्ती व दहीहंडी असल्याने भाविक पहाटेपासून दाखल झाले. वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या मंदिरात दिवसभर रुक्मिणीचे दर्शनासाठी रांग लागली. यात महिला मंडळीचा संख्या अधिक होती. देवस्थान संस्थानने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती, तर ठाणेदार सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.सायंकाळच्या दहीहंडीसाठी थांबलेल्या भाविकांनी दिवसभर प्रवचनाचा लाभ घेतला तसेच काही हौशींनी वर्धा नदीत नौकाविहार केला. दुपारी २ ते ४ या वेळेत हभप सर्जेराव देशमुख महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. यानंतर दहीहंडीसाठी भाविक गोकुळपुरीत दहीहंडी स्थळी आले.दहीहंडीचे पूजन व दही तीर्थाचे भाविकांना वाटप करून सायंकाळी ५.३० वाजता रीतसर सुरुवात झाली. दहीहंडीचे पूजन सर्जेराव देशमुख महाराज व अतुल ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नामदेव अमाळकर, सदानंद साधू, पंचायत समितीचे माजी सभापती विलास माहोरे व इतर सन्माननीय व्यक्ती उपस्थित होत्या. दहीहंडी सोहळा झाल्यावर भाविक आपआपल्या गावी जाण्यास निघाले.विठुरायाला रुक्मिणीच्या माहेरचा अहेरकौंडण्यपूर देवस्थानातून दरवर्षी रुक्मिणीमातेची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होताच संस्थानकडून भव्य स्वागत व देवी रुक्मिणीला आहेर अशी परंपरा आहे. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पंढरपूरहून परत निघण्यापूर्वी श्रीक्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी संस्थानकडून रुक्मिणीच्या माहेरातील नैवेद्य पांडुरंगाला अर्पण करण्यात आला. संस्थानचे विश्वस्त अतुल ठाकरे, सुरेश चव्हाण, व्यवस्थापक काळे, वारकरी भोयर विठ्ठलाची पूजा केली. यावेळी पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त तसेच पालखीतील हभप अशोक महाराज, बबनराव इंगळे, विठ्ठल राठोड, आकाश ठाकरे, सुभाष अर्मळ, अनूप मेहकर, अंबादास जाधव, सुनील वेरुळकर ही मंडळीदेखील उपस्थित होती. यानंतर पालखी तेथून निघाली आणि पाडव्याच्या दहीहंडीला कौंडण्यपुरात दाखल झाली.