शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जगात सर्वाधिक वाघ भारतात मेळघाट व्याघ्र प्रकल्प सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:01 IST

शंभरहून अधिक वाघांचा सांभाळ करण्याची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची क्षमता आहे. एका वाघाला साधारणतः २५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५० वाघ आहेत. यात २१ मादी आणि २९ नर असा समावेश आहे. याव्यतिरिक्त वाघांचे २२ छावे आहेत. वाघांचे छावे विचारात घेतल्यास मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकूण ७२ वाघ सध्या वास्तव्यास आहेत.

ठळक मुद्दे१९७३ मध्ये व्याघ्र अभयारण्याची संकल्पना

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जगातील एकूण वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. भारत जगात सर्वाधिक वाघ असलेला देश ठरला आहे.         सन २००६ मध्ये देशात १४११ वाघ होते. सन २०१० मध्ये १७०० वाघ होते. टायगर एस्टिमेशन रिपोर्टनुसार सन २०१४ मध्ये भारतात २२२६ वाघ होते. त्यात लक्षणीय वाढ झाली असून, सन २०१८ मध्येही वाघांची संख्या २९६७ झाली आहे. जागतिक स्तरावर ही नोंद सर्वाधिक ठरली आहे.  तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सन १९७३ मध्ये सर्वप्रथम देशात व्याघ्र अभयारण्य ही संकल्पना अस्तित्वात आणली. देशात पहिले नऊ व्याघ्र अभयारण्य घोषित केले. यात मेळघाट व्याघ्र अभयारण्याचा समावेश केला गेला. राज्यातील हा पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. वाघांच्या संरक्षण, संवर्धनात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे योगदान उल्लेखनीय असून, देशातील टॉप टेनमधील एक व्याघ्र प्रकल्प म्हणून मेळघाटची ओळख आहे. 

१०० वाघांची क्षमताशंभरहून अधिक वाघांचा सांभाळ करण्याची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची क्षमता आहे. एका वाघाला साधारणतः २५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५० वाघ आहेत. यात २१ मादी आणि २९ नर असा समावेश आहे. याव्यतिरिक्त वाघांचे २२ छावे आहेत. वाघांचे छावे विचारात घेतल्यास मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकूण ७२ वाघ सध्या वास्तव्यास आहेत.

देशातील मोठा व्याघ्र प्रकल्प वाघांचा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रफळाच्या अनुषंगाने देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. याचे क्षेत्रफळ २७०० चौरस किलोमीटर असून, ३६१.२८ चौरस किलोमीटरचे गुगामल राष्ट्रीय उद्यान त्यात समाविष्ट आहे.

क्राईम सायबर सेलमेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वाइल्ड लाईफ क्राईम सायबर सेल २०१३ मध्ये स्थापन केला गेला. देशातील हा पहिला सायबर सेल. देशांतर्गत जवळपास अडीचशे शिकाऱ्यांना, चोरट्यांना या सेलने पकडून दिले आहे. मागणीनुसार त्या त्या राज्याला हा सायबर सेल आपली सेवा देतो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत चोरट्या शिकाऱ्यांवर या सायबर सेलने आपला वचक निर्माण केला आहे.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग