शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

ग्राहक संरक्षण कायद्याविषयी बहुतांश ग्राहक अद्यापही अज्ञानी

By admin | Updated: December 24, 2015 00:24 IST

ग्राहक संरक्षण कायद्यात आमुलाग्र बदल होऊन मोठी सुधारणा झाली आहे.

वर्षभरात ३५५ प्रकरणे दाखल : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आढावाअमरावती : ग्राहक संरक्षण कायद्यात आमुलाग्र बदल होऊन मोठी सुधारणा झाली आहे. मात्र, जनजागृतीअभावी अद्यापही बहुतांश ग्राहकवर्ग या कायद्याविषयी अज्ञानी असल्याचे २९ व्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त घेतलेल्या आढाव्यात निदर्शनास आले आहे. १ जानेवारी ते २० डिसेंबरपर्यंत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे ३५५ प्रकरणे दाखल झाले असून त्यापैकी १८२ प्रलंबित आहेत. २४ डिसेंबर १९८६ रोजी अस्तित्वात आलेला ग्राहक संरक्षण कायद्यात आमुलाग्र बदल झाल्याने हा कायदा ग्राहकांसाठी अत्यंत उपयोगी ठरला आहे. मात्र, त्यांच्या अमंलबजावणीसंबंधी शासन उदासीन आहे. त्यातच व्यापारी वर्गाची न बदलणारी मानसिकता व नागरिकांमधील अज्ञानामुळे अजूनही हा कायदा बाल्यावस्थेतच आहे, असे मत राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटन मंत्री अजय गाडे यांनी मांडले आहे. ग्राहक हा व्यापाऱ्यांसाठी देवता आहे. मात्र, बहुतांश व्यापारी वर्ग वस्तू विकल्यानंतर ग्राहकांना सहकार्य करीत नाही. फसवणुकीची तक्रार करण्याकरिता समोर येत नसल्याचेही दिसून येत आहे. हा कायदा ग्राहकाभिमुख करणे, त्यांची त्वरित परिणामकारक अंमलबजावणी होणे, विक्रीपश्चात ग्राहकांना उत्कृष्ट सेवा प्राप्त होणे, मानसिकतेत बदल घडवून आणणे व ग्राहकांत जनजागृती करणे. याबाबत शासनाने लक्ष दिल्यास खऱ्या अर्थाने ग्राहकांना न्याय मिळेल. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील कामकाज नियमित करावेअमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरण अमरावतीच्या खंडपीठात पाठविण्यात यावेत. या खटल्यांना अमरावतीत स्थांनातरण करण्यासाठी नाहरकतची आवश्यकता नसावी, असे मत जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष नंदकिशोर यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मांडले. तसेच महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात प्रकरणाच्या निपटाऱ्यांची कामे नियमित सुरू राहावी, ज्या ग्राहकांना सुनावणीची प्रक्रिया तत्काळ पाहिजे, त्या त्यांना नागपूर येथे जावे लागते. त्याकरिता ग्राहक मंच कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा भत्ता भरून त्यांना सोबत न्यावे लागते. ही बाब खर्चीक त्रासदायक असल्याचे मतही कंलत्री मांडले आहे. राज्य ग्राहक आयोग खंडपीठात ७८ प्रकरणांचा निपटाराजिल्ह्यात १६ मार्च २०१५ रोजी राज्य ग्राहक आयोग खंडपीठाची स्थापना झाली. आतापर्यंत खंडपीठात १९१ प्रकरणे दाखल झाली असून त्यापैकी ७८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. तसेच अमरावती व नागपूर येथील ७०० प्रकरणे खंडपीठाकडे हस्तातंरित झाले आहेत. ग्राहक संरक्षण कायदा लागू होऊन २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, शासनाची उदासीनता, व्यापाऱ्यांची मानसिकता व ग्राहकांमध्ये कायद्याविषयीच्या अज्ञातामुळे अजूनही कायदा बाल्यावस्थेत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे हा कायदा ग्राहकाभिमुख करण्याची गरज आहे. - अजय गाडे, संघटनमंत्री, अखिल भारतीय ग्राहक पंचायत. लोकांनी जागरुक राहून फसवणूक होत असल्यास तत्काळ ग्राहक मंचाकडे तक्रार करावी. - राजेंद्र जुमळे, प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.