शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मान्सून दाखल

By admin | Updated: June 18, 2014 23:50 IST

रोहिणी नक्षत्र पूर्ण कोरडे गेले. मृगाची सुरूवात होऊन १० दिवस लोटले तरीही पावसाचा पत्त्ताच नाही. शेतीची मशागत आटोपलेली. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले. अखेर ही प्रतीक्षा संपली.

बुधवारी ६० मी.मी. पाऊस : पूर्वमान्सून पिकांना दिलासाअमरावती : रोहिणी नक्षत्र पूर्ण कोरडे गेले. मृगाची सुरूवात होऊन १० दिवस लोटले तरीही पावसाचा पत्त्ताच नाही. शेतीची मशागत आटोपलेली. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले. अखेर ही प्रतीक्षा संपली. बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात मान्सूनचा दमदार पाऊस बरसला. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांवर मान्सूनने मेहेरबानी केली.जिल्हाभरात ५० ते ८० मी.मी. पावसाची नोंद झाली. असह्य उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला. या पावसानंतर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांंची लगबग सुरू झाली आहे. इतकेतच नव्हे तर जिल्ह्यात हजार हेक्टरवर पेरणी झालेल्या मान्सूनपूर्व पिकांनासुध्दा हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. यावर्षी मान्सून गेल्या वर्षीच्या तुलनेत आठवडाभर लांबला. गेल्या वर्षी जून महिन्यात पावसाची सरासरी २०७ टक्क्यांपेक्षा अधिक होती. या पार्श्वभूूमीवर शेतकऱ्यांनी यावर्षीसुद्धा खरिपासाठी शेतीची मशागत केली. परंतु पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांना एका पावसाची आवश्यकता असते. ती गरज या दमदार पावसामुळे भरून निघाली आहे. पाऊस बरसल्याने कृषी केंद्रांवरची गर्दीदेखील वाढली आहे. त्यामुळे हा पाऊस सर्व घटकांना सुखावणारा ठरला आहे.जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे पेरणीक्षेत्र एक हजार हेक्टरपेक्षा जास्त आहे. मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी जिल्ह्यात केली जाते. धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर तालुक्यात याचे प्रमाण अधिक आहे. या पिकाला पावसामुळे दिलासा मिळाला आहे.