शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ंजमिनीत गाडलेले माकडाचे पिलू तीन दिवसानंतर बाहेर काढले

By admin | Updated: April 28, 2016 00:13 IST

माकडाच्या पिल्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर ते पिलू स्थानिक गणेश कॉलनी येथील महापालिकेच्या महाराणा प्रताप उद्यानात जमिनीत गाडण्यात आले.

वनविभागाच्या सुपूर्द : गणेश कॉलनी उद्यानात उघडकीस आला प्रकारअमरावती : माकडाच्या पिल्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर ते पिलू स्थानिक गणेश कॉलनी येथील महापालिकेच्या महाराणा प्रताप उद्यानात जमिनीत गाडण्यात आले. हीे घटना सोमवारी निदर्शनास आली. परिणामी जमिनीत गाडण्यात आलेले माकडाचे पिलू तीन दिवसानंतर बुधवारी वनविभागाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.महापालिका उद्यान विभागाचे अधीक्षक प्रमोद येवतीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश कॉलनी येथे महाराणा प्रताप उद्यानात रविवारी एका माकडाचे पिलू उद्यानात आणून गाडले. हे पिलू कोणी आणून गाडले, याचा शोध लागू शकला नाही. कारण रविवारी चौकीदार सुटीवर असल्यामुळे हा प्रकार झाला, असा अंदाज आहे. उद्यानात माकडाचे पिलू गाडल्यानंतर त्या जागेवर पूजा- अर्चा सुद्धा करण्यात आली. माकडाचे पिलू कुठेतरी आकस्मिकरित्या मृत पावल्यानंतर उद्यानात आणून गाडले. कालांतराने या जागेवर मंदिर उभारता येईल, असा हेतू काही जणांचा असावा, असे येवतीकर म्हणाले. मात्र माकडाचे पिलू कशाने मृत पावले, याची शहानिशा करण्यासाठी वनविभागाला पत्र देवून बुधवारी ते बाहेर काढण्यात आले. साधारणपणे तीन ते चार महिन्यांचे हे पिलू असावे, असा अंदाज आहे. माकडाचे पिलू बुधवारी बाहेर काढताच परिसरात दुर्गंधी पसरली होती. मात्र भविष्यात या उद्यानात मंदिर बांधून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे हे पिलू वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. वनकर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन सदर पिलू ताब्यात घेतले. त्यानंतर या पिल्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वडाळी वनविभागाच्या परिसरात हे पिलू गाडण्यात आले आहे. (प्रतिनिधी)माकडाच्या पिल्याचा कशाने मृत्यू झाला असावा, याचा शोध घेण्यासाठी ते वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. उद्यानात जमिनीत गाडण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे मृत माकडाचे पिलू पूजा-अर्चा करुन वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.- प्रमोद येवतीकरअधीक्षक, उद्यान विभाग महापालिका.