शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शहरी बालविकास प्रकल्पांचे महापालिकेसह नगरपालिकेकडून संनियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST

अमरावती : नगरपालिका व महापालिका क्षेत्रात जिल्हा परिषदेमार्फत कार्यरत अंगणवाडीचे मॅपिंग करण्यात आले असून, त्या शहरी बालविकास प्रकल्पांशी ...

अमरावती : नगरपालिका व महापालिका क्षेत्रात जिल्हा परिषदेमार्फत कार्यरत अंगणवाडीचे मॅपिंग करण्यात आले असून, त्या शहरी बालविकास प्रकल्पांशी जोडण्यात आल्या आहेत. शहरी प्रकल्पांचे प्रशासकीय संनियंत्रण नगरपालिका, महापालिका यांच्याकडे देण्याचे प्रस्तावित असून, त्यामुळे इतर शासकीय विभागांशी प्रभावी समन्वय साधणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी सांगितले.

शहरी भागात पंचायतराज संस्थांबरोबर समन्वयाचा अभाव असल्याने शहरी प्रकल्पाच्या पुनर्रचनेची आवश्यकता राज्यस्तरीय अभ्यासगटाने मांडली होती. त्यानुसार ग्रामीण बालविकास प्रकल्पांच्या धर्तीवर शहरी प्रकल्पांचे संनियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देण्यात येणार आहे. यामुळे सर्व विभागांशी प्रभावी समन्वय होऊन योजनांची अंमलबजावणी गतीने होईल व स्थानिक अडचणींचे तत्काळ निराकरण होणे शक्य होणार आहे. अंगणवाडी केंद्रांना मूलभूत सुविधा, आरोग्यविषयक सुविधा आदींसाठी याचा लाभ होईल, असा विश्वास ना. ठाकूर यांनी व्यक्त केला.

या निर्णयामुळे नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी व इतर यंत्रणा महापालिका क्षेत्रात आयुक्त, तर नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. याबाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्याबाबतची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

बॉक्स

२० हजार अंगणवाडी केंद्रांचे जिओ टॅगिंग

ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी नागरी भागातील व नागरी भागालगतच्या साधारण २० हजार अंगणवाडी केंद्रांचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. शहरी भाग व ग्रामीण भागात योजनेची परिणामकारकता सारखी राहण्यास यामुळे मदत होणार आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासही मदत होणार आहे. पूर्वी ग्रामीण भागात कार्यरत अंगणवाड्या सद्यस्थितीत नगरपालिका, महापालिका कार्यक्षेत्रात आल्याने सनियंत्रण नगरपालिका, महापालिका यांच्याकडे देण्यात आले आहे.

बॉक्स

सेविकांच्या पदोन्नतीसाठी नियमांत सुधारणा करणार

राज्यात कार्यरत एक लाखांवर अंगणवाडी सेविकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर पदोन्नती देण्याबाबत विचार होत आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या भरती नियमांची निर्मिती करण्याचे आदेशही विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र अंगणवाडी सेविकांना बालविकास प्रकल्प अधिकारी या पदापर्यंत पदोन्नती मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे. त्यासाठी प्रयत्न होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.