अमरावती : कोरोनात माणसाला जिवंत ठेवायचे असेल, तर खासगी रूग्णालयाच्या काऊंटवर उपचाराआधी भरघोस रक्कम द्यावी लागते. दुर्देवाने रूग्ण दगावला, तर स्मशानभूमीतही पैेसेच मोजावे लागतात. गरीब-श्रीमंत असे काहीही बघितले जात नाही. फक्त बघितल्या जातात त्या नोटा...!
प्लेग, स्पॅनेश फ्लू अशा अनेक महामारी यापूर्वी जगभरात पसरल्या. प्रत्येक महामारीत लाखो लोक मरण पावले. कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. महामारीत कुठे माणुसकीचे दर्शन घडते, तर कुठे निव्वळ पैसा कमाविण्याचा उद्योग सुरू आहे. प्राचीन अमरावती जिल्ह्यात वर्षभरात ५८,३८५ नागरिकांना काेरोनाची लागण झाली. ८१३ रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या २० हजार ७०० सक्रिय रुग्ण आहेत. २१ एप्रिलपर्यंत परिस्थिती आहे.
०००००००००००००००००००
रूग्णालयात बेड, स्मशानभूमीत जागा मिळेना
अमरावती महानगरात व्हेटिंलेटर बेड मिळविणे अशक्यप्राय झाले आहे. कोराेना रुग़्णाच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयांमध्ये अथक परिश्रम घेतल्यानंतर व्हेटिंलेटर किंवा ऑक्सिजन बेड भेटत आहे. रुग्ण दाखल करण्यापूर्वी २५ हजार, तर कुठे ५० हजार ॲडव्हान्सपोटी भरावे लागतात. त्याशिवाय रुग्णाला प्रवेश भेटत नाही.
रुग्ण कितीही गंभीर असला तरी, खासगी रुग्णालयाला त्याचाशी काही देणे-घेणे नाही. रुग्ण बरा होऊन घरी गेला, तर किमान दोन ते अडीच लाख रुपये बिल होते आणि मरण पावल्यानंतरही दीड ते दोन लाखांचे बिल करण्यात येते. बिल भरल्याशिवाय मृतदहेच देत नाहीत. बिल देऊन मृतदेह घेऊन स्मशानभूमीत नेल्यानंतर, तेथे अंत्यविधीसाठी नातेवाईकांना तासंतास उभे राहावे लागतात.
--------------------
नावालाच मोफत अंत्यसंस्कार योजना
दररोज १५ ते २० रूग्णांचा मृत्यू होत आहे. प्रत्येक मृतांवर शहरातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. महापालिकेने अंत्यसंस्काराठी स्मशानभूमीची व्यवस्था केली. हिंदू स्मशानभूमीत लाकडासाठी २७०० रूपये लागतात. गॅस दाहिनीसाठी १५०० रूपये लागतात. लाकडे महाग झाल्यामुळे स्मशानात प्रत्येक मृतदेहाच्या नातेवाईंकाकडून घेतले जातात. महापालिका प्रशानसनाकडून मृतदेहांसाठी पीपीई किट पुरविते.
००००००००००००००००००००००
बॉक्स
दहनभूमी
अमरावती, बडनेरा अशा दोन्ही शहरात येथे एकूण १५ ठिकाणी दहनभूमी आहेत.
बॉक्स
गॅस शवदाहिनी
दोन गॅस शव दाहिनीची सुविधा सुरू करण्यात आली आहेत. हिंदू स्मशानभूमीत टप्प्याटप्प्याने ही सुविधा सुरू करण्यात येत आहे.
बॉक्स
३९ स्मशानभूमींमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार
१८ हिंदू स्मशानभूमी
०८ मुस्लिम दफनभूमी
खासगी ०२ हिंदू स्मशानभूमी
०५ ख्रिश्चन दफनभूमी
०६ इतर धर्मीयांच्या स्मशानभूमी
-------------
बॉक्स
येथील गर्दीही जीवघेणी
मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी गर्दी केली जाते. काऊंटरवर सॅनिटायर्झर नसतात. प्रवेशद्वारावर कोण नसते. सुरक्षा रक्षकाच्या केबिनमध्ये कोणी नसते. जेथे पावती मिळते तिथे काहीच काळजी घेतली जात नाही.
बॉक्स
नियमांचे पालन आवश्यच
मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी किमान १० ते १५ लोक असतात. यामुळे संसर्गाचा धोका अधिक आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले तरच कोरोनाला हरवणे शक्य आहे.
-----------------
ज्या मृतांच्या नातेवाईकांकडे काहीच सोय नाही,अशावेळी अंत्यसंस्काराची जबाबदारी महापालिका घेते. हिंदू स्मशानभूमी संस्थेला कोविड मृतांसाठी काही रक्कम दिली जाते. यंत्रसामग्रीचा वापर केला जातो.
- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका.