शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

वृध्देचा विनयभंग, चिंचोलीत दोन गट आमोरासमोर

By admin | Updated: December 4, 2015 00:24 IST

एका युवकाने ७० वर्षीय म्हातारीचा विनयभंग केला. म्हातारीच्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीची धिंड : गावकऱ्यांनीही दिली पोलिसांत तक्रार मोर्शी : एका युवकाने ७० वर्षीय म्हातारीचा विनयभंग केला. म्हातारीच्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील आरोपीने एका गटातील काही लोकांविरूध्द मारहाणीची तक्रार दाखल केली. त्यावरून एकूण ७ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गावकऱ्यांनी आरोपीची धिंड काढणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाईची मागणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे लावून धरली. ही घटना बुधवार दि. २ डिसेंबरला चिंचोली गवळी गावात घडली. विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव विनोद हरणे, असे आहे. त्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून हेमंत नागले, धनराज नागले, उमेश नागले, तात्यासाहेब बागडे, शुध्दोधन पाटील, अजय पाटील आणि दिनेश तागडेविरुध्द मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलीस दप्तरी दाखल झालेल्या तक्रारीनुसार चिंचोली गवळी येथील ७० वर्षीय म्हातारी स्मशानभूमी परिसरात बुधवारी सरपण वेचण्याकरिता गेली असता आरोपी विनोद हरणे याने या म्हातारीचा विनयभंग केला. बुधवारी याप्रकरणी मोर्शी पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती. गुरूवारी पीडित वृध्देने पोलीस ठाण्यात आरोपी विनोद हरणेविरुध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४, ५०४, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत प्रकरण नोंदविले असून आरोपीला अटक केली. दरम्यान आरोपी विनोद हरणे याने गावातील हेमंत नागले, धनराज नागले, उमेश नागले, तात्यासाहेब बागडे, शुध्दोधन पाटील, अजय पाटील, दिनेश तागडे आदींनी त्याला मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. त्या आधारे मोर्शी पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुध्द भादंविच्या कलम १४३, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा नोंदविला. यातील आरोपींना अजून अटक व्हायची आहे. (तालुका प्रतिनिधी)कायदा हातात घेणाऱ्यांविरुध्द कारवाईची मागणी याप्रकरणी गावकऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दिली आहे. त्यात गावातील ६० ते ७० लोकांनी जाणीवपूर्वक आरोपीला बदडले आणि त्याची धिंड काढली. कायदा हातात घेऊन हा प्रकार केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत केली आहे. यापूर्वीसुध्दा या लोकांनी गावातील एका पोलीस पाटलावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.शांतता समितीची सभा याप्रकरणी गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, म्हणून ठाणेदार सुधीर पाटील यांनी शांतता समितीची बैठक आयोजित करून कोणावरही अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली. यापुढे अशी घटना पुन्हा घडणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. आरोपीच्या तक्रारीप्रमाणे त्याला मारहाण करणाऱ्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटातील लोकांनी या प्रकारात त्यांची चूक कबूल केली आहे. - सुधीर पाटील, ठाणेदार, मोर्शी.चिंचोली गवळी गावात घडलेली घटना निंदनीय आहे. भविष्यात अशी घटना घडू नये, याची काळजी घेऊ. गावकऱ्यांनीसुध्दा या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची ग्वाही दिली आहे. सध्या गावात शांतता आहे. - दिलीप गवई, उपविभागीय पोलीस अधिकारी.