शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी मोदींची सरपंचांना साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 00:16 IST

सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यापासून शेतीपिकांचे नुकसान टाळून त्यांना आर्थिक मदत मिळावी, ...

जनजागृतीसाठी पत्र : आपत्तीत पिकांचे नुकसान टाळाअमरावती : सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यापासून शेतीपिकांचे नुकसान टाळून त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्राच्या पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल जागृती व्हावी, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावगावच्या सरपंचांना पत्र पाठवून पीक विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्याला कृषीबिंदू मानून शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी व त्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत व्हावी, यासाठी केंद्राने नुकतीच पंतप्रधान राष्ट्रीय पीकविमा योजना सुरू केली. यामध्ये पूर्वीच्या विमा योजनेतील अनेक जाचक अटी रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व हंगामांसाठी एकच पीकविमा असल्याने प्रत्येक पिकाला याचा लाभ होणार आहे. त्यामुळे पिकनिहाय विमा काढण्याची आता गरज राहिली नाही. कोणत्याही भागातील शेतकरी खरीप व रबी हंगामासाठी पीक विम्याचा लाभ घेऊ शकतो. या प्रिमीअमपोटी शेतकऱ्यांना २० टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे. गारपीट, पूर, अतिवृष्टी, दुष्काळ व पावसाअभावी शेतीपिकांचे नुकसान यासाठी पीकविम्याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे गावपातळीवर या योजनेची जनजागृती व्हावी, यासाठी नरेंद्र मोदी यांनी सरपंचांना साद घातली आहे. नरेंद्र मोदी यांचे थेट पत्र सरपंचांना आल्यामुळे सरपंच भारावले आहेत. गावचे सरपंच हे त्या गावाच्या विकास कामांचे प्रमुख असतात. तसेच गावातील प्रत्येक गोष्टीच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन जाणे त्यांचे कर्तव्य आहे, याची जाणीव करून देणारा मोदी यांचा पत्रव्यवहार महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच गाव प्रमुखाला जर योजनेची माहिती करून दिली तर गावातील शेवटच्या घटकांपर्यंत ती माहिती पोहोचणार आहे. (प्रतिनिधी)पंतप्रधानांच्या पत्रामुळे सरपंच भारावलेपंतप्रधान कार्यालयाच्यावतीने गावोगावच्या सरपंचांशी थेट पत्रव्यवहार करण्यात आला. यामध्ये पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन सरपंचांना करण्यात आले आहे. देशाच्या प्रमुखांचे पत्र थेट ग्रामपंचायतींना आल्याने सरपंच भारावले आहेत.