शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
3
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
4
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
5
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
6
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
7
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
8
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
9
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
10
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
11
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
12
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
13
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
14
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
15
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
16
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
17
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
18
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
19
BIGG BOSS 19 House: असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
20
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल

मोदी लाटेत सोडली नाही मेळघाटने आघाडीची साथ

By admin | Updated: May 25, 2014 23:15 IST

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएसह भाजपच्या नमो फॅक्टरने देशात इतर पक्षांचे पानिपत केले. अमरावती लोकसभा मतदार संघातही ‘अडसूळ मजबुरी है मोदी जरुरी है’ या फॅक्टरचा प्रभाव पडला.

श्यामकांत पाण्डेय - धारणी

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएसह भाजपच्या नमो फॅक्टरने देशात इतर पक्षांचे पानिपत केले. अमरावती लोकसभा मतदार संघातही ‘अडसूळ मजबुरी है मोदी जरुरी है’ या फॅक्टरचा प्रभाव पडला. नमो लहरचा मेळघाट विधानसभा मतदारसंघात कोणताही प्रभाव जाणवला नाही. याउलट २00९ पेक्षाही जास्त मताधिक्य आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना देऊन आजही मेळघाटात काँग्रेस पक्षालाच पहिली पसंती दिली गेली.

मेळघाट विधानसभा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून सध्या काँग्रेसचे केवलराम काळे आमदार आहेत. माजी आमदार राजकुमार पटेल यांनी भाजपची सोडचिठ्ठी घेत नवनीत राणा यांच्याकरिता खुलेआम प्रचारात सहभाग घेतला. त्यांनी एकीकडे दम मारून राणा यांना मताधिक्य देण्याचा प्रयत्न चालविला असताना काँग्रेसचे काही नेते आतून राणांच्या मतात भर घालण्याऐवजी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात मग्न होते. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात मेळघाटातून मताधिक्य मिळवता आले नाही. तरीही २00९ मध्ये रिपाइंचे गवई यांना अडसुळांपेक्षा ५९३७ मताधिक्य प्राप्त करता आले. त्या मानाने यंदा हे मताधिक्य चार पटीने जास्त म्हणजेच २१,४९६ मते मिळवता आले तेही मोदी लहर असताना.

मेळघाट मतदारसंघ सदैव काँग्रेस पक्षाशी प्रामाणिकपणा बाळगणारा मतदारसंघ आहे. येथे आजही इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांचा आदर्श जपला जातो. परंतु येथील नेत्यांची आपसातील मतभेद व स्वार्थी राजकारणाने काँग्रेसला वर येऊ दिले नाही. येथील काँग्रेस, राकाँची प्रवृत्ती सामान्य जनतेला घातक ठरत आहे. २0१४ मध्ये संपूर्ण देशात मोदी लाट होती. या लाटेने जिल्ह्यातील मतदारांना आकृष्ट केले व एकदा संधी देऊन पाहू, असा विचार केला. पण मेळघाटने राकाँच्या नवख्या उमेदवारालाही भरभरुन मते दिली. येथील काँग्रेस, राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांनी प्रामाणिकता दाखविली असती तर मेळघाटचे मताधिक्य ५0 हजारांच्यावर राहिले असते, असे आता दबक्या आवाजात बोलले जात आहे. याचा फटका मात्र विधानसभेत बसू नये याची काळजी आमदार केवलराम काळे यांना घेणे आवश्यक झाले आहे.