शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल टॉवर मालमत्ता कराच्या अखत्यारित

By admin | Updated: May 19, 2017 00:41 IST

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रातील मोबाईल टॉवर्सवर मालमत्ता कर आकारण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.

निर्देश : महापालिकेत गतवर्षीपासून अंमलबजावणी लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रातील मोबाईल टॉवर्सवर मालमत्ता कर आकारण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. यासंदर्भात १६ मे रोजी शासन निर्णय जारी केला असला तरी महापालिकेत यापूर्वीच या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. या निर्णयाने महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीतील मोबाईल टॉवर मालमत्ता कराच्या अखत्यारित असून त्यांची कराच्या मागणी तथा वसुलीत कोट्यवधींनी वाढ अपेक्षित आहे. महानगरपालिका विरुद्ध जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लि. व इतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय यासाठी आधारभूत ठरविण्यात आला आहे. याबाबत ४० सिव्हील अपिल एकत्रित करून सर्वोच्च न्यायालयाने १६ डिसेंबर २०१६ रोजी न्याय निर्णय दिला. या अपिलमध्ये गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयासोबत मुंबई उच्च न्यायालयात विविध रीट याचिकांमध्ये मोबाईल टॉवर्सवर मालमत्ता कर आकारण्याबाबत दिलेल्या निर्णयाच्याविरुद्ध दाखल अपिल विचारात घेण्यात आल्या. त्यावर १६ डिसेंबर २०१६ ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयातील परिच्छेद ३०, ३१, ३२ व ३३ मध्ये मोबाईल टॉवर्स ही मालमत्ता असल्याने संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांचेकडून मालमत्ता कर वसूल करता येतो, असे नमूद आहे. त्याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचित करण्यात आला आहे. असा आहे शासन निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मोबाईल टॉवर उभारण्यात आलेल्या ठिकाणी (मोकळ्या जागा अथवा टेरेस, अस्तित्वातील इमारतीमधील मोकळ्या जागा) मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ व तत्सम अधिनियमातील मालमत्ता कर लागू करण्याच्या तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारण्यात यावा.