शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा वीज कंपनीत तब्बल ११ तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 00:03 IST

एका गरीब सायकल रिक्षा चालकाला आलेल्या-गेलेल्या विद्युत बिलाची महिनेवारी कपात करावी, त्यांचे काढून नेलेले घरगुती मीटर पुन्हा लावून विद्युत पुरवठा नव्याने सुरू करावा,

रिक्षाचालकाला ६५ हजारांचे बिल : महावितरणची लालफीतशाहीअचलपूर : एका गरीब सायकल रिक्षा चालकाला आलेल्या-गेलेल्या विद्युत बिलाची महिनेवारी कपात करावी, त्यांचे काढून नेलेले घरगुती मीटर पुन्हा लावून विद्युत पुरवठा नव्याने सुरू करावा, या मागणीसाठी म.रा. वितरण कंपनीच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्याच्या कक्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तब्बल ११ तास ठिय्या आंदोलन केले. ठाणेदारांनी मध्यस्थी करून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आले.गोवर्धन विहार येथील रहिवासी वासुदेव फुसाजी पालेवार हे सायकल रिक्षाचालक असून त्यांचे घरगुती विद्युत बिल दर महिन्याला अ‍ॅव्हरेज प्रमाणे देण्यात येत असल्याने त्यांनी वीज कंपनीकडे तक्रारी अर्ज केला. १८ जुलै रोजी केलेल्या तक्रारी अर्जात त्यांनी विद्युत बिल अधिक येत असल्याने त्यांनी मीटर बदलवून मागितले होते. तरीही अ‍ॅव्हरेज बिल देणे सुरू होते व ते भरत होते. त्यांना ११ जनेवारी २०१६ रोजीच्या विद्युत देयकात ६५ हजार ५५० रुपये बिल देण्यात आले. गुरुवारी सकाळी ११ वाजता मनसेचे तालुकाध्यक्ष प्रितेश अवघड शहराध्यक्ष विवेक महल्ले, भूषण नागे, सागर डांगे आदी १५ ते २० कार्यकर्ते विद्युत कंपनीच्या कार्यालय, अचलपूर विभाग येथे धडकले. कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी सुटीवर असल्याने त्यांचा प्रभार उपकार्यकारी अभियंता जि.ह. वाघमारे यांच्याकडे होता. ममहाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचेकडे याबाबत जाब मागितला असता विद्युत देयक ३३ हजार नव्वद रुपये भरण्याचे ठरविण्यात आले.सदर बिल एक हजार रुपये महिन्याप्रमाणे भरण्यासाठी परवानगी द्यावी, रिक्षावााल्याच्या घरातील काढून नेलेले मीटर पुन्हा लावावे, त्यांचा विद्युत पुरवठा सुरू करावा, अशा मागण्या करण्यात आल्या. हे नियमात बसत नसल्याचे सांगत उपकार्यकारी अभियंता वाघमारे यांनी नकार दिला असता आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही असे म्हणत त्यांच्यात दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. (शहर प्रतिनिधी)ठाणेदारांची मध्यस्थीमनसेच्या अचानक सुरु झालेल्या ठिय्या आंदोलनात पोलीस बंदोबस्तात रात्री ९ वाजले तरी आंदोलन सुरुच होते. शेवटी परतवाड्याचे ठाणेदार यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची मनधरणी सुरु केली. आंदोलन तात्पुरते मागे घ्या म्हणून समजावले. रात्री १० वाजता उपकार्यकारी अभियंता कुंटे यांनी ३-४ दिवसात विद्युत मीटर लावून देतो, असे लेखी आश्वासन नंतर आंदोलन रात्री उशिरा मागे घेण्यात आले. हे ठिय्या आंदोलन मनसेचे तालुका अध्यक्ष अवघड यांचे नेतृत्वात करण्यात आले होते. यामध्ये अंकुश पाटील, दिनेश पवार, भुषण नागे, आदी २५ ते ३० कार्यकर्ते सहभागी झाले होते.कार्यकारी अभियंत्यांनी पळ काढलादुपारी ३ वाजले तरी आंदोलन सुरुच होते, आपण याच मिनिटांत लघु शंका करून येतो, असे सांगत प्रभारी कार्यकरी अभियंता वाघमारे त्यांच्या कक्षातून गेले ते परतलेच नाही. त्यांनी आपला भ्रमणध्वनीही बंद करून ठेवला होता.सदर रिक्षावाले गृहस्थ गरीब असून त्यांना अंधारात राहावे लागत असल्याने त्वरित मीटर लावून विद्युत पुरवठा सुरू करावा, तसेच आंदोलन सुरू असताना कार्यालय वाऱ्यावर सोडून पळ काढणाऱ्या प्रभारी कार्यकारी अभियंता वाघमारेंना निलंबित करा.- प्रितेश अवघड,तालुका अध्यक्ष मनसेआजच्या आंदोलनामुळे निर्माण झालेली समस्या सोडविण्याऐवजी उपकार्यकारी अभियंता वाघमारे येथून निघून गेले. मोबाईल स्विच आॅफ केला. यामुळे एखादवेळी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो ही बाब आपण जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळविणार आहोत.- किरण वानखडे, ठाणेदार