शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयाचा दुरुपयोग!

By admin | Updated: June 19, 2016 00:02 IST

विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या पदवीधरांच्या नोंदणीमध्ये सरकारी कार्यालयाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप..

युवक काँग्रेसचा आरोप : पदवीधर नोंदणीतील गैरप्रकार अमरावती : विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या पदवीधरांच्या नोंदणीमध्ये सरकारी कार्यालयाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे सचिव भय्या पवार यांनी केला आहे. यासंदर्भात शनिवारी पवार यांच्या नतृत्वात जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. २७ मे रोजी जिल्हा परिषदेतील एनआरएचएम येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून अनधिकृतरीत्या पदविधरांची नोंदणी सुरू होती, तर १५ जून रोजी अमरावती तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात लतीश देशमुख हे पदवीधर मतदारसंघाच्या अर्जावरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व अन्य माहिती घेत असल्याचे दिसून आले होते, असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. मात्र, त्यानंतरही नायब तहसीलदार रमेश इंगोले व लिपिक शिंदे यांच्यावर निलबंनाची कारवाई करण्यात आली नाही. त्यापूर्वी एनआरएचएममधील दोषींवरही कारवाई करण्यात आली नाही. संबंधिताची थातुरमातूर चौकशी करून सदर प्रकरण दडपण्याचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. शनिवारी दुपारी १२ वाजतापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवक काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी न बोलाविल्याने दुपारी २ वाजेपर्यंत या पदाधिकाऱ्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन केले. यावेळी राहूल येवले, गुड्डु धर्माळे, फिरोज भाई, गुड्ड हमीद, आदित्य पेलागडे यांच्यासह आदी उपस्थित होते. पदवीधर निवडणूक तोंडावर आली असताना मतदार नोंदणीमध्ये होणारे गैरप्रकार थांबवावेत व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. (प्रतिनिधी)