शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचे मानधन मिळते तरी कुणाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 01:08 IST

महापालिकेला कंत्राटी सेवा पुरविणाऱ्या एजन्सीच्या मनुष्यबळाचे इन्स्पेक्शन केल्यास महापालिकेची अर्थिक लूट थांबू

प्रदीप भाकरे ल्ल अमरावती महापालिकेला कंत्राटी सेवा पुरविणाऱ्या एजन्सीच्या मनुष्यबळाचे इन्स्पेक्शन केल्यास महापालिकेची अर्थिक लूट थांबू शकते. अनेक कामगार केवळ कागदावर असून त्या मोबदल्यात महापालिका मात्र संबंधित कंत्राटदार एजन्सीला महिन्याकाठी लाखो रुपयांचे मानधन अदा करते. महापालिकेने सुरक्षा रक्षकांसह स्वास्थ्य निरीक्षक, वाहनचालक, संगणक चालक, मजूर, बागवान आदी कंत्राटीतत्वावर घेतले आहेत. मात्र, दिवसेंदिवस कंत्राटींचा हा आकडा फुगत असून त्यावर कुणाचेही नियंत्रण उरलेले नाही. कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांच्या मानधनाची फाईल जीएडीकडून चालविली जाते. मात्र, प्रत्यक्षात देयकासोबत जोडलेल्या कामगारांची हजेरी तपासल्या जात नाही. कंत्राटदार जोडेल किंवा दाखवेल तिच पूर्वदिशा, हाच जीएडीचा खाक्या राहिला आहे. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी याकंत्राटी कामगारांची स्थळनिहाय तपासणी केली होती. आता नव्याने ती गरज भासू लागली आहे. जेथे गरजच नाही तेथे वाजवीपेक्षा अधिक सुरक्षा रक्षक दाखविण्यात आले आहेत. जकातनाक्यावर दाखविलेले ७ सुरक्षा रक्षक नेमकी कुणाची सुरक्षा करतात, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. परकोट परिसरातील सुरक्षा रक्षक बेपत्ता जवाहर गेट ते गांधी चौक परिसरातील परकोटाजवळ तीन सुरक्षा रक्षक असल्याचा दावा ‘अमृत’ संस्थेकडून केला जातो. प्रत्यक्षात गुरुवारी सकाळी ६ ते २ आणि दुपारी २ ते रात्री १० या कालावधीत एकही सुरक्षा रक्षक आढळून आला नाही. प्रत्यक्षात परकोटाजवळ ‘डगवार’ या खासगी सुरक्षा यंत्रणेचे दोन गार्ड आढळून आलेत. आम्ही तिघे असतो. मात्र, आमचा ‘अमृत’ किंवा महापालिकेशी कुठलाही संबंध नसल्याचे त्या सुरक्षा रक्षकांनी स्पष्ट केले. विनागणवेश सुरक्षा रक्षक श्रीकृष्णपेठेतील महापालिकेच्या उद्यानात दोन्ही सुरक्षा रक्षक ‘शिपाई’ म्हणून आढळून आले. सुरक्षारक्षक म्हणून त्यांना ओळखपत्राशिवाय अन्य कुठलीही सुविधा देण्यात आली नाही. अनेक ठिकाणी ‘अमृत’चे सुरक्षा रक्षक ‘शिपाई’ म्हणून काम करीत आहेत. त्यांना गणवेश,काठी,शिटी देखील देण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ‘अमृत’चा गोरखधंदा सुरु आहे. गणवेश, काठी, शूज पुरविणे अनिवार्य असल्याची अट करारनाम्यात आहे. मात्र, या अटीचे वारंवार उल्लंघन होत असताना प्रशासनाने अर्थपूर्ण मौन धारण केले. फ्रेजरपुरा स्मशानभूमीत एक सुरक्षा रक्षक फ्रेजरपुरा स्मशानभूमीत दुपारी २ ते रात्री १० या कालावधीसाठी दोन सुरक्षा रक्षक दाखविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात गुरुवारी दुपारी ३.३० वाजता येथे भेट दिली असता एकच सुरक्षा रक्षक आढळून आला. असे आहेत कंत्राटी कर्मचारी ४सुरक्षा रक्षक : १५७, १ मिस्त्री, २ वेल्डर, ६० मजूर, २ सहायक अधीक्षक ४स्वास्थ्य निरीक्षक : २१, ३० वाहन चालक, ४ सर्वेअर ४बागवान : ०८, ४ लिपिक, १ सुतार, ३ उपलेखाधिकारी.