शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्यात मायलेकाची हत्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2015 00:44 IST

तालुक्यातील आडनदी फाट्यानजीकच्या ५० फूट दरीत आई व मुलाचा अत्यंत कुजलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

१४ पासून बेपत्ता : कविठा येथील रहिवासी, आडनदीजवळी घटनानरेंद्र जावरे चिखलदरातालुक्यातील आडनदी फाट्यानजीकच्या ५० फूट दरीत आई व मुलाचा अत्यंत कुजलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता सदर घटना उघडकीस आल्यावर रात्री ७.४५ वाजता दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यात आली. हत्या की आत्महत्या याचा तपास आता पोलीस करीत आहेत. आडनदी फाट्याजवळ मंगळवारी सकाळी १० वाजतादरम्यान वनमजूर पुरण ब्रिजलाल काळे हा लघुशंकेसाठी गेला असता त्याला दुर्गंधी आली. त्याने इतर मजुरांना ही बाब सांगितली. त्यावरुन एखाद्या जनावराचा कुजलेला मृतदेह असल्याची शक्यता वर्तविली. पुरण काळे दुर्गंधीच्या दिशेने जाऊन पाहिले असता त्याला दोन मृतदेह नग्नावस्थेत असल्याचे आढळून आले. घाबरुन त्याने पळ काढला. आठवले नामक वनकर्मचाऱ्याला सदर बाब सांगितली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सकाळी १० वाजतापासून अज्ञात मृतदेहाची ओळख रात्री ७.४५ वाजता दरम्यान पटली. मृताची मुलगी ज्योती आमरे (रा.हिवरखेड) हिने केली. सुमित्रा लालू नागले (७५) व ऋषी लालू नागले (५५, रा. कविठा) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही आई व मुलगा असल्याचे ज्योतीने पोलिसांना सांगितले. हत्या की आत्महत्या?आई व मुलाचा नग्नावस्थेत कुजलेल्या स्थितीत दरीत मृतदेह आढळून आल्याने या दोघांचीही हत्या की आत्महत्या याचा खुलासा तपासात होणार आहे. दोघांचेही मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आले. संशयास्पद मृतदेहचिखलदरा : आई व मुलाचा मृतदेह असला तरी दोघांच्या मृतदेहाजवळ पिवळ्या रंगाची अर्धवट साडी आढळून आली. एका बॉटलमध्ये पेट्रोल, आगपेटी, पिशवी, निळ्या रंगाचा सदरा, काळसर पँट आढळून आले.