शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची मेरीट चाचणी

By admin | Updated: October 23, 2016 00:33 IST

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी संभाव्य उमेदवारांच्या मेरीट चाचणीला सुरुवात केली आहे.

स्वबळाचा नारा : युती, आघाडीबाबत संभ्रमअमरावती : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी संभाव्य उमेदवारांच्या मेरीट चाचणीला सुरुवात केली आहे. निवडून येण्याची क्षमता या प्रमुख निकषांवर उमेदवारी देण्याची तयारी पक्षश्रेष्ठींनी चालविली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढाव्याच्या पार्श्वभूमिवर शहरातील राजकारण तापू लागले आहे. आघाडी आणि युतीचा निर्णय प्रदेश स्तरावर होईल, असे सांगत असताना चारही प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. महापालिका निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी पाहता आणि चार सदस्यीय प्रभाग प्रणाली लक्षात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने स्वतंत्ररीत्या इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. युती आणि आघाडीचा निर्णय जिल्हास्तरावरील नेत्यांना घ्यायचा आहे, असे स्पष्ट करत पक्षश्रेष्ठींनी स्थानिक राजकारण्यांमध्ये समेट घडवून आणण्याची तयारी चालविली आहे. मात्र शहराची राजकीय परिस्थिती पाहता युती आणि आघाडी होणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे. २२ प्रभागांतून ८७ नगरसेवक निवडण्यासाठीचा प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित झाल्यानंतर इच्छुकांनी जोरदार उचल घेतली आहे. भाजपने थेट मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत आगामी निवडणुकांचा बिगूल फुंकला आहे. त्यापूर्वी शरद पवार यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्फुल्लिंग चेतविण्याचे काम केले. या हेविवेट नेत्यांच्या मार्गदर्शनाने भाजप आणि राष्ट्रवादी महापालिका निवडणुकीच्या रंगात रंगली आहे. युती आणि आघाडीबाबत प्रदेश आणि जिल्हास्तरावर एकवाक्यता नसल्याने स्थानिक प्रमुखांनी युती-आघाडी होणार नाही, हे गृहित धरून उमेदवारांची मेरीटप्रमाणे चाचपणी चालवली आहे. चारही प्रमुख पक्षांसह बसपा पूर्ण क्षमतेने निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.