शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

मेळघाटच्या ‘ग्रास मॅन’ ने १२ राज्यातील ३० व्याघ्र प्रकल्पात फुलविले कुरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 13:44 IST

Amravati News चिखलदरा येथील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने एक दोन नव्हे, तब्बल देशातील १२ राज्यातील ३० पेक्षा अधिक व्याघ्र प्रकल्पात तृणभक्षी प्राण्यांसाठी कुरणक्षेत्र तयार केले आहे.

ठळक मुद्दे ‘गवत असेल तरच वाघ वाचेल’ची संकल्पना

नरेंद्र जावरे

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जंगल असेल तर वाघ दिसेल, वाघासाठी आवश्यक असलेले तृणभक्षी प्राणी आणि त्या प्राण्यांसाठी अति आवश्यक असलेले गवती कुरण अशा या अन्नसाखळीला तयार करण्यासाठी चिखलदरा येथील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने एक दोन नव्हे, तब्बल देशातील १२ राज्यातील ३० पेक्षा अधिक व्याघ्र प्रकल्पात तृणभक्षी प्राण्यांसाठी कुरणक्षेत्र तयार केले आहे. त्यामुळे पर्यावरणासह व्याघ्र संवर्धनात मोठी मदत झाली आहे.

चिखलदरा येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात पर्यावरणशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. गजानन मुरतकर असे या प्राध्यापकाचे नाव आहे. गवती कुरणामुळे जमिनीची धूप, तापमान थांबण्यासह पाण्याचा निचरा, कीटक, सरपटणाऱ्या प्राण्यांना नैसर्गिकरीत्या आश्रयस्थान, तृणभक्षी प्राण्यांना आवडते खाद्य व वाघ, बिबट्यासारख्या मांसभक्षी प्राण्यांना जंगलातच शिकार मिळत असल्याने शहरात जाऊन मानव-वन्यजीव संघर्ष थांबण्यास मदत झाली आहे. एकंदर मुंगी ते हत्तीपर्यंत गवत अन्नसाखळीचा दुवा ठरले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात इतर व्याघ्र प्रकल्पांपेक्षा ११६ पेक्षा अधिक गवताच्या प्रजाती आहेत. ताडोबात केवळ बांबू असल्याने मेळघाटच्या सांभरपेक्षा तेथील तृणभक्षी प्राणी कमी वजनाचा असल्याचे निष्कर्ष पुढे आल्याचे मुरतकर यांनी सांगितले.

तृणभक्षी प्राण्यांत गवताच्या आवडीनिवडी

मानवांमध्ये जेवणाच्या आवडीनिवडी आहेत त्याचप्रमाणे चितळ, गवा, सांबर, अशा विविध तृणभक्षी प्राण्यांच्या आवडीनिवडी आहेत, काहींना मुलायम व कडक गवत आवडते. त्यानुसार चितळ मार्व्हल गवत हे रसगुल्लाप्रमाणे आवडते, तर गवा कुसळी व गोंधळी, सांबर गवत कमी व झाडांची पाने, फुले, फळे जास्त खातो. तृणभक्षी प्राण्यासाठी दुर्वा, पवन्या, रानतूर, रानमूग, रानसोयाबीन, बांबू, अशा विविध प्रजातींचे गवत आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ