शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासावर चालणारी मेळघाटातील आगळी बँक !

By admin | Updated: March 18, 2017 00:01 IST

मेळघाटातील प्रत्येक आदिवासी परंपरेत काही ना काही बोध घेण्यासारखे असते.

गावपंचायतीची व्यवस्था, आज होणार ताळेबंद सादर श्यामकांत पाण्डेय धारणीमेळघाटातील प्रत्येक आदिवासी परंपरेत काही ना काही बोध घेण्यासारखे असते. अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे होळी सणादरम्यान पाहायला मिळणारी गावपंचायतीची बँक व्यवस्था. दरवर्षी रंगपंचमी दरम्यान आपापल्या सोयीनुसार गावपंचायत बसविण्यात येते. यामध्ये गरजुंना वाटण्यात आलेल्या कर्जाची व्याजासह वसुली करून नव्याने कर्जवाटप करण्यात येते. नोंदणीकृत आधार नाहीअमरावती :या व्यवस्थेला कोणताही नोंदणीकृत आधार नसला तरी याकर्जाची परतफेड कोणतेही कारण न सांगता केली जात असल्याने या परंपरेची विश्वासार्हता पाहण्यासारखी आहे. मेळघाटात गाव पंचायत प्रत्येक गावात असते. या पंचायतीचा प्रमुख साधारणपणे गावातील पोलीस पाटील, आडा पटेल किंवा सर्वमान्य प्रतिष्ठित व्यक्ती असतो. त्याला सहायक म्हणून काही सुशिक्षित मंडळी काम करतात. होळीनंतर गाव पंचायतीद्वारे वाटण्यात आलेल्या कर्जाची सव्वापटीने वसुली केली जाते. याचाच अर्थ वार्षिक २५ टक्के व्याजाची आकाराणी करून कर्ज खुले करण्यात येते. ही रक्कम होळीनंतर व पंचमीच्या पूर्वी गावपंचायतीमध्ये जमा करणे बंधनकारक असते. याचे तंतोतंत पालन प्रत्येक लाभार्थी न चुकता करून आपले कर्तव्य पार पाडतोे. हेच या पंचायतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. सुटसुटीत कर्जवाटपाला प्रामाणिकतेची जोडवाटण्यात आलेल्या कर्जाची एका रजिस्टरवर नोंद केली जाते. यात कर्जधारकाचे पूर्ण नाव, उचल केलेली रक्कम आणि त्याची सही असते. गरजुंना त्यांच्या मागणीनुसार कर्जपुरवठा केला जातो. यात शेती, लग्न, पूजा आदींसाठी कर्ज देण्यास प्राधान्य दिले जाते. हे कर्ज बुडविण्याचा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो. यामुळेच आज प्रत्येक गावातील पंचायतीची रक्कम लाखोंच्या घरात असून जेवढे मोठे गाव तेवढी जास्त उलाढाल. अशी व्यवस्था इतरत्र कोठेही पाहायला मिळत नाही. कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे केली जाते.