शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या जागेसाठी वडदच्या जमीनधारकांसोबत बैठक

By admin | Updated: January 18, 2017 00:11 IST

महापालिकेच्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात स्मार्ट सिटीसाठी वडद येथील जागा घेण्याकरिता तेथील शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.

शेतकऱ्यांची कृती समिती स्थापन होणार : केंद्र शासन पुरस्कृत स्पर्धेसाठी तिसऱ्यांदा प्रस्तावअमरावती : महापालिकेच्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात स्मार्ट सिटीसाठी वडद येथील जागा घेण्याकरिता तेथील शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये शोतकऱ्यांना सांगितले की, वडद येथील जागा स्मार्ट सिटीकरिता दिल्यास त्या परिसराचा विकास होईल. त्याठिकाणी शाळा, दवाखाना, रस्ते, नाली, इत्यादी अत्याधुनिक सुविधा देता येतील. तसेच ती जागा विकसित करून ३० टक्के जागा शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येईल व उर्वरित जागा विकसितत करण्यात येईल. याबाबत शेतकऱ्यांनी कृती समिती तयार करावी व त्याबाबत अहवाल पुढील सत्रात ठेवावे. यावेळी महापालिका आयुक्त हेमंत पवार, उपआयुक्त नरेंद्र वानखडे, सहायक संचालक नगररचना अधिकारी सुरेंद्र कांबले, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, सिस्टम मॅनेजर अमित डोंगरे, अभियंता व वडद येथील जमीनधारक उपस्थित होते. यावेळी स्मार्ट सिटीबाबत सादरीकरण करण्यात आले. यामध्ये शहराचे आर्थिक दृट्या व नोकरी व्यवसाय सुधारीकरण करणे करिता अ‍ॅग्रोटेक बिझनेस सेंटर निर्माण करणे, नगर विकास योजने अंतर्गत मौजे वडद येथे बिझनेस सेंटर तयार करणे,नवीन घरे उभारणे, पॅनसिटी अंतर्गत शडरातील नागरिकांची सुरक्षितता तसेस स्मार्ट वाहतुक तयार करणे, वेगवेगळ्या शासकीय योजने अंतर्गत प्रकल्प तयार करणे अशा बांबीचे सादरीकरण करण्यात आले. मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी सर्व संबंधितांना आश्वासित केले कि आपल्या संमतीशिवाय स्मार्ट सिटीचा प्रकल्प सदर जागेवर निर्माण केला जाणार नाही. योजनेत भूसंपादन केले जाणार नाही. आपले सर्वांचे एकमत झाल्यावरच आपण या प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करु, अशी ग्वाही आयुक्तांकडून देण्यात आली. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी तिसऱ्या फेरीकरिता अमरावती महापालिकेला ३१ मार्चपर्यंत प्रस्ताव पाठवायचा आहे. त्यासाठी ग्रीनफिल्ड अंतर्गत वडद येथील जागेचा विकास करण्याचा मानस असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. ३० टक्के जमीनधारकांना जमीन विकसित करुन देणे,२० टक्के जमीनीवर नफा, १५ टक्के कृषि तंत्रज्ञानावर आधारित उद्योग विकसित करणे, १० टक्के सामाजिक पायाभूत सुविधा, १० टक्के खुली जमीन, भूखंड आरक्षित करणे, १० टक्के जमिनी रोड सेवेद्वारे जोडणे,५ टक्के उपयुक्तता सेवेकरिता आरिक्षत ठेवण्यात आले आहे. जमीन मालकाची संमती मिळाल्यावर पुढची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. तसेच जमीन मालकांना एफएसआय २ टक्के देण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्याचा फायदा आहे. (प्रतिनिधी)