शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, उपमहापौरपद अल्पसंख्याकांकडेच !

By admin | Updated: September 4, 2014 23:26 IST

महापालिकेत ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या आघाडीनुसार आ. रावसाहेब शेखावत आणि संजय खोडके हे अल्पसंख्याक समुदायाला

काँग्रेसचे पक्षादेश जारी : शेखावत, खोडके न्यायाच्या भूमिकेत अमरावती : महापालिकेत ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या आघाडीनुसार आ. रावसाहेब शेखावत आणि संजय खोडके हे अल्पसंख्याक समुदायाला न्याय देण्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. त्यानुसार महापौर, उपमहापौरपदाचे उमेदवार निश्चित करण्यात आले आहे.महापालिकेत ८७ सदस्य संख्या असून महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विजयासाठी ४४ सदस्य संख्या आवश्यक आहे. त्यानुसार काँग्रेसकडे २९ तर राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटकडे २३ सदस्य आहेत. आघाडीत एकूण ५२ सदस्य असून या संख्याबळाच्या आधारावर महापौर, उपमहापौरांची निवडणूक आघाडी सहजतेने जिंकू शकते, असे राजकीय समीकरण आहे. मात्र राष्ट्रवादी काँगेस फ्रंटमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादाचेही परिणाम महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत होण्याची दाट शक्यता आहे. महापौरपदाच्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक असल्याने या निवडणुकीला अत्यंत महत्त्व आले आहे. आघाडीच्या जुन्या करारानुसार महापालिकेत सत्ता स्थापन व्हावी, यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील आहेत. मात्र राष्ट्रवादी फ्रंटमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असलेल्या ७ सदस्यांना संजय खोडके यांच्या गटाचे नेतृत्व मान्य नसल्याने हे सदस्य वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. या सात सदस्यांमध्ये महापौरपदासाठी सपना ठाकूर व जयश्री मोरय्या यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, संजय खोडके यांच्या गटाने महापौर पदासाठी अल्पसंख्याकांना न्याय देण्याची भूमिका घेत उमेदवार निश्चित केल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर आ. रावसाहेब शेखावत यांनीसुद्धा उपमहापौर पदासाठी अल्पसंख्याक सदस्यांची वर्णी लावण्याचा निर्णय घेतल्याने महापौर, उपमहापौर या दोन्ही पदावर अल्पसंख्याकांचे वर्चस्व राहणार असल्याचे चित्र आहे. महापालिकेत आघाडीची सत्ता स्थापन व्हावी, यात दुमत नाही. परंतु संजय खोडके यांच्या गटाशी हातमिळवणी न करता काँग्रेसने महापौर, उपमहापौरपदाचे गणित जुळवून आणावे, असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे. राष्ट्रवादीच्या सात सदस्यांना सोबत घेत इतरही सदस्यांची मदत घेऊन महापौर, उपमहापौर निवडणुकीचा किल्ला लढविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काँग्रेसवर दवाब वाढवीत असल्याची माहिती आहे. महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीला अनुसरुन आ. रावसाहेब शेखावत, पक्षनेता बबलू शेखावत, विलास इंगोले, वसंतराव साऊरकर आदी काँग्रेसचे नेते त्रस्त झाले आहेत. अशातच महापालिकेतील सर्वपक्षीय मुस्लिम सदस्यांनी शेख जफर यांना उपमहापौरपद देण्याची मागणी आ. शेखावत यांच्याकडे रेटून धरल्याने त्यानुसार काँग्रेसला विचार करावाच लागेल, अशी राजकीय गरज निर्माण झाली आहे.