शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

इंधन घोटाळ्याच्या चौकशीला ‘मे’चा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 22:05 IST

महापालिकेच्या अतिक्रमण विभागात उघड झालेल्या लॉगबूक व इंधनातील अनियमिततेची चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही. याबाबतची नस्ती तूर्तास मुख्य लेखापरीक्षकांकडे परत पाठविण्यात येणार असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंतिम चौकशी अहवाल येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देचार महिने पूर्ण : फाईल मुख्य लेखापरीक्षकांकडे परत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण विभागात उघड झालेल्या लॉगबूक व इंधनातील अनियमिततेची चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही. याबाबतची नस्ती तूर्तास मुख्य लेखापरीक्षकांकडे परत पाठविण्यात येणार असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंतिम चौकशी अहवाल येण्याची शक्यता आहे.डिसेंबर २०१७ च्या तिसऱ्या आठवड्यात अतिक्रमण विभागातील वाहनांचे लॉगबूकमध्ये अनियमितता आढळून आली होती. त्या प्रकाराला ‘लोकमत’ने ‘अतिक्रमण निर्मूलन विभागात इंधन घोटाळा’, ‘वाहनांचे लॉगबूक चालकांच्या घरी’ व ‘लॉगबूक अपूर्ण; देयकांना मान्यता कशी?’ या वृत्तमालिकेतून वाचा फोडली. त्याची दखल घेऊन अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांना २२ डिसेंबर २०१७ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यांच्या उत्तरानंतर या अनियमिततेची चौकशी करण्याची जबाबदारी उपायुक्त महेश देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली. देशमुखांनी याबाबत मुख्य लेखापरीक्षकांकडून अहवाल मागितला. याबाबत मुख्य लेखापरीक्षकांनी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २०१७ या तीन महिन्यांची इंधन देयके तपासली. त्यात मुख्य लेखापरीक्षकांनी अनियमितता दर्शविणाºया बाबी वस्तुनिष्ठपणे मांडल्या.अतिक्रमण विभागाकडे दोन पोकलॅन, तीन जेसीबी, दोन टिप्पर ट्रक अशा एकूण सात वाहनांसाठी इंधनाचा खर्च केला असून, वाहन लेख्यात अनेक कामे आरोग्य आणि स्वच्छतेसंदर्भात दाखविले गेले आहेत. मात्र, त्या वाहनांची स्वच्छता वा आरोग्य विभागाने मागणी केली असल्याचा अभिलेख परीक्षणादरम्यान उपलब्ध करून देण्यात आला नाही. आरोग्य विभागातील स्वच्छताविषयक कामे कंत्राटदारामार्फत होत असल्याने ही वाहने अतिक्रमण काढण्यासाठी अल्पकाळ वापरलेली दिसतात, असा महत्त्वपूर्ण अभिप्राय मुख्य लेखापरीक्षकांनी दिला आहे. याशिवाय अन्य गंभीर अनियमिततांवर बोट ठेवण्यात आले आहे.उपायुक्तांनी सूचविले पुनर्विलोकनलॉगबूकमधील अनियमितता व इंधनातील अपहारावर मुख्य लेखापरीक्षकांनी आक्षेप वजा ताशेरे ओढले आहेत. मात्र, उपायुक्त महेश देशमुख यांना तो चौकशी अहवाल रूचलेला नसून, त्यांनी मुख्य लेखापरीक्षकांना पुनर्विलोकन करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे फाइलचा होणारा संभाव्य प्रवास पाहता, त्या अहवालावर मे महिन्यातच अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे संकेत आहेत.