शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

धारणी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

शेजारच्या गावातील शिवारात मंडप : नऊ जणांविरूद्ध गुन्हे धारणी : तालुक्यातील तातरा गावातील एका अल्पवयीन आदिवासी मुलीचा विवाह ...

शेजारच्या गावातील शिवारात मंडप : नऊ जणांविरूद्ध गुन्हे

धारणी : तालुक्यातील तातरा गावातील एका अल्पवयीन आदिवासी मुलीचा विवाह मंगळवारी दुपारी राजस्थान येथील ३० वर्षीय युवकाशी अंबाडी शिवारात पार पडणार होता. त्याची माहिती आदिवासी संघटनेच्या पदाधिकाºयांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन तो विवाह उधळून लावला.

तातरा गावातील रहिवासी असलेल्या एका दाम्पत्याने अल्पवयीन मुलीचा विवाह राजस्थान येथील योगेश शांताराम पालके (२५) याच्याशी करण्याचे ठरविले होते. आई-वडिलांनी गावात विवाह न करता अंबाडी गावातील एका दाम्पत्याच्या घरी मुलीला आणले व त्यांच्या शेतात मंगलवारी विवाह करण्याचा बेत आखला. त्यानुसार, नवरदेव योगेश शांताराम पालके, वडील शांताराम फकिराम पालके (६८), आई कुसुम शांताराम पालके, भाऊ उमेश पालके (३०, सर्व रा. राजस्थान) हे मंगळवारी दुपारी ३ वाजता शेतातील विवाहस्थळी पोहोचले. तेथे दोन्ही पक्ष व ब्राम्हणाच्या उपस्थितीत विवाह सुरू झाला.

दरम्यान, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आदिवासी संघटनेच्या पदाधिकारी मालती कासदेकर व संदीप तोटे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धारणी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे, कॉन्स्टेबल वसंत चव्हाण यांनी दोन्ही पक्षांकडील नातेवाईक, भटजी व तेथील लग्नसाहित्य जप्त केले. याप्रकरणी पानखाल्या येथील ग्रामसेवक रेखा खवले यांनी धारणी पोलिसांत फिर्याद दाखल केली. एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. त्यात वर-वधूंचे आई वडील, भाऊ, शेतमालक व भटजींचा समावेश आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना आदिवासी संघटनेचे हिरालाल मावस्कर, दिलीप जावरकर, राजू पतोरकर, नंदू दहिकरे पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.

कोट

अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात येत असल्याची माहिती मिळताच वधूच्या वयाची चौकशी करून सर्वांना ताब्यात घेतले. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

- विलास कुलकर्णी, ठाणेदार, धारणी पोलीस ठाणे