शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

मांजरखेङ कसबा येथे स्वयंसाहाय्यता समूह बचत गटाचा बाजारहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदअंतर्गत स्थापित स्वयंसाहाय्यता समूह बचत गटाच्या माध्यमातून चांदूर रेल्वे पंचायत समितीअंतर्गत मांजरखेड कसबा येथे ...

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदअंतर्गत स्थापित स्वयंसाहाय्यता समूह बचत गटाच्या माध्यमातून चांदूर रेल्वे पंचायत समितीअंतर्गत मांजरखेड कसबा येथे बाजारहाटाचे उद्‌घाटन अमरावती येथील जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख व मांजरखेड येथील सरपंच दिलीप गुल्हाने, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच किरणताई देशमुख, तालुका व्यवस्थापक सविता थेटे, अमित ढवळे, प्रभाग समन्वयक रेखा खेडकर, ग्रामसेवक इगळे, पत्रकार राहुल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्‌घाटक व प्रमुख पाहुणे यांचे बचत गटांच्या महिलांनी स्वागत केले. शुक्रवार 16 जुलै रोजी दुपारी तीन वाजता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मांजरखेड ग्रामपंचायत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मांजरखेड गावातील मंगळवार व शुक्रवार या दिवशी हाताने तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्द राहणार आहेत, या उद्देशाने गावातील बचत गटाच्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यावेळेस महिलांना मार्गदर्शन करताना जिल्हा व्यवस्थापक अमरावती यांनी सांगितले की, आपण चांगल्या प्रकारे मोगऱ्याची झाडे सर्वच बचत गटांना देणार असून, महिलांनी घरोघरी मातीच्या कुंडीत किंवा जमिनीवर लावून त्याचे संगोपन करावे. त्याची फुले तोडून बाजारात उपलब्ध करावीत. मांजरखेड कसबा येथील सरपंच दिलीप गुल्हाने यांनी गावातील पाणीपट्टी व करवसुलीकरिता बचत गटांनी प्रयत्न केले तर त्यातूनच भव्यदिव्य असे ग्रामपंचायतमार्फत ग्रामसंघ कार्यालय बांधून देईल, असे आश्वासन सरपंच दिलीप गुल्हाने यांनी दिले. महाराष्ट्र शासनांतर्गत ग्रामीण भागात स्थापन करण्यात आलेल्या स्वयंसाहाय्यता समूह बचत गटाच्या बाजारहाटाचे उद्‌घाटन बाजार चौकात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मांजरखेड येथील कार्यक्रमाचे संचालन प्रणिता राहुल देशमुख यांनी करून आभार मानले. यावेळी उज्ज्वला भास्कर ढगे, जया संजय देशमुख, आर्थिक साक्षरता सखी स्वाती संदीप देशमुख, ग्रामसंघ अध्यक्ष रेखा गजानन गवई, संगीता सूर्यवंशी, भारती देशमुख, दर्शना देशमुख, माया शिरभाते, शारदा खोडके, रेखा तामखाने, किरण जयस्वाल, राणी तसरे आदी बचत गटातील महिलांची उपस्थिती होती.

: मांजरखेड कसबा येथील महिला बचत गटाच्या बाजारहाटाचे उद्‌घाटन करताना सचिन देशमुख, सरपंच दिलीप गुल्हाने, ग्रामसेवक इगळे, पत्रकार राहुल देशमुख.

180721\1620-img-20210718-wa0022.jpg

photo