शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीतील बिहारी मजुरांची होणार चौकशी

By admin | Updated: November 23, 2015 00:16 IST

बाजार समितीत परवानगीविना वास्तव्यास असलेल्या बिहारी मजुरांची दखल शहर पोलीस आणि सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने घेतली आहे.

पोलीस उपायुक्तांचे आदेश : सहायक आयुक्त कामगार कार्यालयाचीही दखलअमरावती : बाजार समितीत परवानगीविना वास्तव्यास असलेल्या बिहारी मजुरांची दखल शहर पोलीस आणि सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने घेतली आहे. हे मजूर आले कसे, त्यांचा इतिहास काय, त्यांचे पोलीस रेकॉर्ड काय, यासंबंधाची बारकाईने चौकशी करून त्यांच्यात कोणी गुन्हेगारी पार्श्वभूमिचे इसम तर नाहीत ना?, याचाही तपास पोलीस करणार आहेत.बाजार समितीत असलेल्या मराठी मजुरांच्या हक्कावर घाला घालणाऱ्या बिहारी मजुरांना मराठी मजुरांनी विरोध दर्शविला आहे. हे बिहारी मजूर विनापरवानगीने बाजार समितीत वास्तव्यास असल्यामुळे त्यांच्यात काही गुन्हेगार तर नाहीत ना, अशी भीती मराठी मजुरांनी व्यक्त केली होती. याकडे आता पोलीस व सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने लक्ष वेधले आहे.बिहारी मजुरांची चौकशी करण्याचे निर्देश पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांच्या निर्देशानुसार माथाडी निरीक्षक बाजार समितीतील बिहारी कामगारांच्या नोंदींबाबत चौकशी करणार आहेत. अमरावती बाजार समितीमधील १ हजारांवर माथाडी कामगारांच्या नोंदी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात आहेत. मात्र, आता बाजार समितीत आलेल्या नवीन बिहारी कामगारांच्या नोंदी अद्याप करण्यात आल्या नाहीत. बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी नवीन कामगारांच्या नोंदी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात करणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप बिहारी कामगारांच्या नोंदी न झाल्याने माथाडी निरीक्षकांमार्फत बिहारी कामगारांच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात आता माथाडी निरीक्षक कामगारांची ओळखपत्राच्या आधारावर चौकशी करून नोंदी घेणार आहेत. यामुळे बिहारी मजुरांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)