शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे

By admin | Updated: March 1, 2016 00:14 IST

मराठी भाषा आणि साहित्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे आवश्यक आहे.

श्रीपाल सबनीस : विद्यापीठात मराठी राजभाषा दिन उत्साहात अमरावती : मराठी भाषा आणि साहित्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी लेखकांनी साहित्याची निर्मिती करताना त्याचे भान ठेवावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. विद्यापीठाच्या मराठी विभागाच्यावतीने कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात 'मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केल. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू विलास सपकाळ, मराठी विभागप्रमुख तथा वाङ्मय विद्याशाखेचे अधिष्ठाता मनोज तायडे, हेमंत खडके उपस्थित होते. मराठी भाषा, साहित्य व संस्कृती समोर नेमके कुठले प्रश्न आहेत, हे लक्षात घेऊन मराठी प्रतिभासंपन्न कशी होईल, यासाठी उद्योन्मुख साहित्यकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. केवळ राजकीय लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न न होता सामाजिक व आर्थिक लोकशाही टिकवण्याचीसुद्धा गरज आहे. यादृष्टीने मराठी साहित्यकांनी विचार करावा, असे सबनीस यांनी सांगितले. शोधनिबंध व संशोधनाच्या माध्यमातून मराठी भाषा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावी आणि विद्वानांनी नेहमी जागृत राहून कार्य करावे, असे सपकाळ यांनी अधोरेखित केले. यावेळी प्रथम आल्याबद्दल व सुवर्णपदके प्राप्त केल्याबद्दल मराठी विभागाची विद्यार्थिनी शीतल सुरेंद्र तायवाडे हिचा, बार्टीतर्फे मनोज तायडे यांचे पुस्तक पुनर्मुद्रित केल्याबद्दल सत्कार झाला. प्रास्तविक मनोज तायडे यांनी, संचालक हेमंत खडके व आभार प्रणव कोलते यांनी मानले. कार्यक्रमाला सबनीस, सतीश तराळ, सोनपेठकर, बी.जी. खोब्रागडे, कुमार बोबडे, शरद जोध, अण्णा वैद्य, वैशाली गुडधे, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर आदी उपस्थित होते.