शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

मराठ्यांचे मोर्चे मूक, संख्या मात्र बोलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2016 00:11 IST

राज्याच्या ३५ जिल्ह्यांसह जगातल्या १८ देशांमध्ये मराठ्यांचे मूकमोर्चे निघालेत.

प्रवीण गायकवाड : मराठा आरक्षण हवेच, १४ डिसेंबरला नागपुरात महामोर्चाअमरावती : राज्याच्या ३५ जिल्ह्यांसह जगातल्या १८ देशांमध्ये मराठ्यांचे मूकमोर्चे निघालेत. राज्यात तर तीन कोटी मराठे एकत्र आलेत. जगाने नोंद घेतली. आतापर्यंतच्या मूकमोर्चाचे रेकॉर्ड ३.५० लाखांचे होते. मात्र मराठ्यांच्या मोर्चांनी ते रेकॉर्ड केव्हांचेच मोडले असून मोर्चे मूक होते, संख्या मात्र बोलकी असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. सकल मराठा समाजाच्यावतीने सोमवारी येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख व्याख्यानमाला घेण्यात आली. त्यात ‘मराठा मोर्चामागील असंतोषाची कारणे’ या विषयावर प्रवीण गायकवाड बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटक म्हणून आ. यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. वीरेंद्र जगताप होते. व्यासपीठावर जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अरविंद गावंडे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मोहिते, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा मयुरा देशमुख, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमाकांत तेटू, तिरळे कुणबी समाजाचे रमेश आळे, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे हेमंत देशमुख यांची उपस्थिती होती. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजानंतर तब्बल २७ वर्ष मराठे नेतृत्वाविना लढले. तंजावरपासून पेशावरपर्यंत राज्य निर्माण केले. त्यामुळे मराठ्यांच्या नेतृत्वावर कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. मात्र आज आर्थिक हलाखीमुळे मराठ्यांची परिस्थिती बेताची झाली आहे. त्या अनुषंगाने राज्यभर नव्हे, तर देशभर निघालेल्या मोर्चांमध्ये आम्ही २२ मागण्या मांडल्या. त्या मागण्यांचा तांत्रिक, कायदेशीर आणि घटनात्मक अभ्यास करण्यासाठी आम्ही तज्ज्ञ समिती नेमली असून १४ डिसेंबरच्या मोर्चाच्या निवेदनानंतर सरकारला उणिव काढण्यास संधीच राहणार नाही, असे गायकवाड म्हणाले. मराठा मोर्चाची दखल जगाने घेतली आहे. जगाच्या पाठीवर अभूतपूर्व मूकमोर्चा असे नामानिधान या मोर्चाने मिळविले असून मराठ्यांमधील खदखद या मोर्चातून रस्त्यावर आल्याचे ते म्हणाले. तर मराठा आरक्षण वास्तव आणि गरज या विषयावर बोलताना याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू मांडली. मराठा मोर्चानंतर अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये कमी आली असून हक्काच्या शिक्षणासाठी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. शेती तोट्याची होणे, हे मराठ्यांच्या माघारण्याचे मुख्य कारण असल्याचे आ. वीरेंद्र जगताप म्हणाले तर आ. यशोमती ठाकूर यांनी मराठ्यांनी स्पिरीट जोपासले पाहिजे, नेमके काय करावयाचे आहे ते ठामपणे ठरविले पाहिजे, अशी भूमिका मांडली.