शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी धडक

By admin | Updated: November 20, 2014 22:44 IST

मराठा आरक्षणाचा अध्यादेश त्वरित विधिमंडळात पारित करून त्याचे कायद्यात रूपांतर करावे, उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबंधी सक्षमपणे बाजू मांडून आरक्षण कायम करावे आणि महाराष्ट्रात

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : संभाजी ब्रिगेड, छावा संघटनेची मागणी अमरावती : मराठा आरक्षणाचा अध्यादेश त्वरित विधिमंडळात पारित करून त्याचे कायद्यात रूपांतर करावे, उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबंधी सक्षमपणे बाजू मांडून आरक्षण कायम करावे आणि महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी आदी मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड, छावा संघटनेने गुरूवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी केंद्र व राज्य सरकारविरोधात तीव्र्र घोषणाबाजी केली व जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन दिले.तत्कालीन आघाडी सरकारने मराठा व मुस्लीम आरक्षणाचा निर्णय राज्यपालांचा अध्यादेश काढून राज्यात लागू केला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे ही मागणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व मराठा समाजातील इतर संघटनांनी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने डिंसेबर २०१४ मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधीमंडळात राज्यपालांनी काढलेल्या मराठा , मुस्लीम आरक्षणाचे अध्यादेश पारीत करून कायद्यात रूपांतर करावे व उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू समर्थपणे मांडून मराठा समाजाचे आरक्षण कायम करावे, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय महाराष्ट्रात शासनाने दुष्काळ जाहीर करून कापसाला ७ हजार रूपये प्रति क्विंटल, उसाला ४ हजार रूपये प्रती टन याप्रमाणे भाव देऊन कर्ज माफी करावी, अशी मागणीही संभाजी ब्रिगेड, छावा संघटनेने केली आहे. यावेळी अभय गावंडे, संजय ठाकरे, वरद इंगोले, निकेश बोंडे, लौकीक पाटील, दिनेश ठाकरे, विकास कुलट, मंगेश हिरूळकर, जिगदीश साबळे, शवम भडके, मनीष बघेल, अंबादास काचाळे, नितीन व्यास, नरेंद्र जाधव, विजय मोरे, चंद्रकांत आसरे, मुकेश मापारे, दीपक कोकाटे आदींची उपस्थिती होती.