शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

२१ कर्मचार्‍यांवर ५५ गावांचा कारभार

By admin | Updated: July 13, 2014 22:43 IST

आसेगाव पोलीस स्टेशनची व्यथा: निवासस्थानांची पडझड, कर्मचार्‍यांवर अतिरिक्त भार

देपुळ : इतरांच्या समस्या मार्गी लावणार्‍या आसेगाव पोलिस स्टेशनलाच सद्यस्थितीत विविध समस्यांनी ग्रासले आहे. पोलिस निवासस्थानांची दुरवस्था झाली असून मनुष्यबळाचीही कमतरता जाणवत आहे. ५५ गावांच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी २१ कर्मचार्‍यांना पेलावी लागत आहे. आसेगाव पोलीस स्टेशनला ३६ कर्मचारी मंजूर असताना येथे केवळ २१ कर्मचार्‍यावर ५५ गावांचा कारभार ठाणेदार एस.व्ही. लष्करे यांना पाहावा लागत असल्याने त्यांना कायदा व सुव्यवस्था शांतता प्रदान करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या ५५ गावामध्ये रात्रीच्या गस्तीसाठी पोलीस लागतात. पोलीस स्टेशनमध्येही राखीव ठेवावे लागतात. यामध्ये भांडण, तंटे यांच्या फिर्यादी निपटारे, कार्यवाया, महिलांचा छेड, अवैध धंदे, सणवारानिमित्त वेळोवेळीचे बंदोबस्त कोर्टाचे प्रकरण, खात्याच्या डागा यातही कर्मचारी गुंततात अशा बिकट परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाणेदाराला तारेवरची कसरत करावी लागत आहे. आसेगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांसाठी बांधण्यात आलेले निवासस्थानामध्ये ठाणेदाराचे निवासस्थान वगळता सर्वच निवासस्थानाची पडझड झाली आहे. तसेच छतावरचे कवेलू फुटले.भिंती कोसळल्या, दार खिडक्या मोडल्या या निवासामध्ये झाडही वाढत आहेत. याची अवस्था भूकंप झाल्यासारखी झाली. त्यामुळे पोलिसांना येथे राहता येत नाही आणि आसेगावमध्ये त्यांना कुटुंब घेउन राहण्यासाठी जागाही भाड्याने मिळत नसल्याचा दावा पोलिस कर्मचार्‍यांनी केला आहे. भाड्याने जागा मिळत नसल्याचे कारण समोर करून शहराच्या ठिकाणावरून अपडाउन केल्याशिवाय पर्याय नाही. मुख्यालयी राहावे तर निवास नाही, बाहेरगावी राहावे तर मुख्यालयाचा नियम आहे. ईकडे आड तिकडे विहीर अशी आसेगाव पोलिसांची गत झाली आहे. याकडे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जातीने लक्ष घालून आसेगाव पो.स्टे.ला मंजुरातीप्रमाणे कर्मचारी द्यावे व निवासाची दुरुस्ती करावी, अशी जनतेची मागणी होत आहे.