शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

हिवताप, हत्तीरोग विभागात बरेचशे रक्तनमुने तपासणीविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST

इंदल चव्हाण अमरावती : कोविड-१९ च्या आगमनापासून जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरवर कर्तव्य बजावावे लागत असल्याने त्यांचे मुख्य ...

इंदल चव्हाण

अमरावती : कोविड-१९ च्या आगमनापासून जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरवर कर्तव्य बजावावे लागत असल्याने त्यांचे मुख्य कर्तव्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच हिवताप, हत्तीरोग विभागात दर महिन्याला रक्तनमुने तपासणीसाठी येतात. मात्र, प्रयोगशाळा वैज्ञानिक उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात अनुशेष शिल्लक राहिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जिल्हा हिवताप कार्यालयात दर आठवड्याला १२०० ते १४०० अनेशेष राहत आहे. जून ते डिसेंबर हा हिवतापसाठी पोषक कालावधी असतो. जून महिन्यात किमान २० हजार रक्तनमुने घेण्यात आले आहेत. मुळात कोविडमध्ये स्वब घेण्याची जबाबदारी सीएचओ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर व आरोग्यसेविका यांना दिलेली आहे. परंतु पारेषण काळ सुरू होऊनसुद्धा त्यांची सेवा मूळ ठिकाणी वर्ग करण्यात आलेली नसल्याने रक्तनमुने तपासणीवर मोठा फरक पडत आहे. राष्ट्रीय हिवताप व हत्तीरोग कार्यक्रमाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

एकाच प्रयोगशाला वैज्ञानिकाकडे चार केंद्रांचा भार

हिवताप कार्यालयांतर्गत ५९ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, ४८ प्रयोगशाळा वैज्ञानिकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी २२ पदे भरलेली आहेत. यापैकी कर्मचारी प्रसूती रजेवर, तर आसेगाव पूर्णा केंद्रावरील एक कर्मचारी ५-६ वर्षांपासून दीर्घ रजेवर आहे. काहींची सेवा अधिग्रहित केलेली आहे. सद्यस्थितीत कार्यरत सर्व कर्मचारी कोविड सेवेत व्यस्त आहेत. त्यामुळे एकाच कर्मचाऱ्याकडे तीन ते चार केंद्रांचा अतिरिक्त भार देण्यात आल्याची माहिती आहे.

--

डेंग्युचे रुग्ण वाढण्याची संभावना

सद्यस्थितीत आलेल्या रक्तनुमुन्यांत डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याची संभावना व्यक्त होत आहे.

पॉइंटर

हत्तीरोग विभाग

जाने ते मे २०२१ एकूण घेतलेले रक्तनमुने - ३०१५७

तपासलेले रक्त नमुने - २४७६४

दूषित रक्तनमुने- १ सालनापूर (ता. धामणगाव रेल्वे)

एकूण प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मंजूर पदे - ६

तपासणीसाठी कार्यरत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी- ३

कोविड रुग्णालयात सेवारत - ३

हिवताप विभाग

१ एकूण प्राथमिक आरोग्य केंद्रे - ५९

२ एकूण मंजूर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांची पदे - ४८

३ भरलेली प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांची संख्या-२२

४ तपासणीकरिता कार्यरत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संख्या-२२

५ कोविडमध्ये अद्यापही कार्यरत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांची संख्या- सर्व

६ पारेषण काळात एकूण गोळा केलेल्या रक्त नमुन्याची संख्या-२००००

6 तीन दिवसात तपासलेल्या हिवंताप रक्तनमुन्यांची संख्या-

7 अनुशेष तपासणी शिल्लक-नाही

8 दूषित रक्तनमुने संख्या - १

9 दोन ते तीन प्रा आ केंद्राचा अतिरिक्त कारभार जोडण्यात आलेल्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांची प्रा आ के निहाय माहिती.